डोंगरगावला आजपासून हरिनाम सप्ताह आयोजन
esakal February 21, 2026 07:46 PM

कोळवण, ता. २१ : डोंगरगाव- खालची वाडी (ता. मुळशी) येथे श्री भैरवनाथ उत्सवानिमित्त व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रविवार (ता. २२) ते बुधवारपर्यंत (ता. २५) केले आहे. सप्ताहाचे यंदा ३९वे वर्ष आहे. यानिमित्ताने सप्ताहात पहाटे काकड आरती, तुकाराम महाराज गाथा भजन, प्रवचन हरिपाठ कीर्तन व हरिजागर, असे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी पांडुरंग महाराज उगले, सोमवारी श्रीनिवास महाराज जगताप, मंगळवारी ओंकार महाराज दुडे शास्त्री, बुधवारी आशिष महाराज मेणे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.