NRK26A00630
नरखेड (ता. मोहोळ) : येथे नवोदय सामाजिक विचार मंचच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
नरखेडमध्ये २६ वर्षांपासून अखंड रक्तदान शिबिर
नरखेड : येथील नवोदय सामाजिक विचार मंचच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ४५ जणांनी रक्तदान केले. शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम सलग २६ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिबिरास सुरवात झाली. सांगोला येथील रेवनील ब्लड बँक यांच्यावतीने रक्त संकलित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब मोटे होते. यावेळी उपसरपंच सुवर्णा जाधव, माजी जि.प. सदस्य सुनीता सोनार, ग्रामपंचायत सदस्या वैशाली बनसोडे, डॉ. वसंतराव लवंगे, उमेश मेंडगुळे, मुख्याध्यापक श्री. काळे आदींसह नवोदय सामाजिक विचार मंचचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.