Bhandara News: आईच्या निधनानंतरही दिली दहावीची परीक्षा, कर्तव्यनिष्ठेचे कौतुक
esakal February 21, 2026 07:46 PM

पालांदूर : आई अनेक दिवसांपासून कॅन्सरने आजारी होती. मात्र, गुरुवारी (ता.१९) रात्री काळाने तिच्यावर झडप घातली. याचे दुःख मनात ठेवून मुलगा सुखराम भुयारी याने शुक्रवारी(ता.२०) दहावीचा पेपर दिला. याबद्दल त्याच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले जात आहे.

येथील सुखराम निदराम भुसारी याला त्याच्या आईचे आजारपण अनेक दिवसांपासून भावूक करत होते. दरम्यान गुरुवारी रात्री तिचे निधन झाले. यामुळे डोक्यावरील मायेचा हात गेल्याने सुखराम दु:खी झाला.

तरीही दहावीची परीक्षा ही महत्त्वाची असल्यामुळे आईचे दुःख बाजूला ठेवून त्याने शुक्रवारी जिल्हा परिषद हायस्कूल पालांदूर येथील केंद्रावर परीक्षा दिली.

Emotional HSC Exam Story : आईचा मृतदेह घरात असताना मुलीने दिला बारावीचा पेपर; मन सुन्न करणाऱ्या घटनेने गावकरी हेलावले

आईच्या निधनाची बातमी कळताच शाळेतील उपक्रमाशील शिक्षक प्रा.डॉ. युवराज खोब्रागडे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली. कुटुंबीयांनी मुलाच्या भविष्यासाठी दहावीची परीक्षा देण्यास त्याला शाळेत पाठवले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नीलकंठ तरोने आणि शिक्षक उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.