संजय राऊत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त होताच, मंत्री दादा भुसे यांच्याकडून..
Tv9 Marathi February 21, 2026 07:46 PM

संजय राऊत मालेगावातील कोर्टात पोहोचले. मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यासंदर्भातच आज सुनावणी होती. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपला असे दादा भुसे यांनी म्हटले. यादरम्यान संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने विषय संपल्याचेही दादा भुसे यांनी म्हटले. कोर्टामध्येच दादा भुसे आणि संजय राऊत एकत्र आले. यादरम्यान नेमके काय घडले हे सांगताना संजय राऊत आणि दादा भुसे दिसले. संजय राऊत यांनी आपल्याला चुकीची माहिती मिळाली आणि आपण दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे मान्य केले. आम्हाला दोघांना न्यायालयाने पहिले,  विषय संपला आहे.

ज्यांच्यामुळे हा विषय आला तेही दुसऱ्या पक्षात गेले.  दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. माझ्याकडून चुकीच्या आधारावर वक्तव्य केलं आहे. सत्ता पक्षात ते गेले आहेत. दादा देखील सत्ता पक्षात आहेत. आम्हाला हे संपवायचे आहे, असे स्पष्ट शब्दात दादा भुसे यांनी म्हटले.

यावर दादा भुसे यांनी म्हटले की, 178 कोटींच्या घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तो विषय मी आधीच क्लिअर केला आहे. संजय राऊत यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आले होते. दुर्दैवाने काहींनी अडथळा निर्माण केला. सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीचा ट्रान्स्फर केला आहे. हे शब्द मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, त्यासाठी खटला दाखल होता.

राऊत साहेबांना हा आरोप खोटा असल्याचे निदर्शनास आले. अद्वय हिरे यांनी ही खोटी माहिती दिली होती. राऊत यांनी मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम आणि त्यांच्या तब्बेतीचा विचार करता हा दावा संपवला आहे, राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून संपवला, असेही दादा भुसे यांनी म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.