वैभववाडी : जिल्ह्यातील ऊसतोडणी अखेर बुधवारी (ता. १८) पूर्ण झाली. ९०० हेक्टर क्षेत्रातून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ३८ टन उत्पादनच झाले आहे. अतिृवष्टी आणि ८ नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे ऊस उत्पादन घटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सिंधुदुर्गातील ऊस लागवड क्षेत्रात वर्षागणीक घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी ११६० हेक्टरवर ऊस लागवड क्षेत्राची नोंद होती, परंतु जिल्ह्यात यावर्षी ९०० हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात २६० हेक्टरने घट झाली.
अखेर सिंधुदुर्गातील ऊसतोडणी पूर्णजिल्ह्यात वैभववाडी, कणकवली तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र आहे. याशिवाय मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत काही प्रमाणात ऊसशेती आहे. जिल्ह्यातील अधिकतर ऊस डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला गाळपाकरिता जातो, तर काही राधानगरी येथेही नेला जातो. जिल्ह्यात यावर्षी ८ मे पासून पावसाला सुरुवात झाली.
मे महिन्यातील पाऊस काही अंशी ऊसाला किफायतशीर ठरला, परंतु त्यानंतर सतत मुसळधार पाऊस झाला. अनेक दिवस ऊसशेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले. ८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही.
Sindhudurg Csshews : ‘सिंधुदुर्गचा काजू’ जागतिक ब्रँड होणार? काजू बी ला प्रतिकिलो २०० रुपयांची जोरदार मागणीपावसामुळे जमिनीत ओलावा डिसेंबरपर्यंत राहिला. ऊस गाळप हंगाम सुरू झाला, परंतु जिल्ह्यातील अनेक ऊसशेतीपर्यंत जाताना ट्रक रुतण्याची शक्यता असल्याने ऊसतोडणी विलंबाने सुरू झाली.
यावर्षी जानेवारीमध्ये ऊसतोडणी सुरू झाली. सुरुवातीला अतिशय धीम्यागतीने ऊसतोडणी सुरू होती. अवघ्या पाच-सहा यंत्रणा कार्यान्वित होत्या. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यात ३० ते ४० तोडणी यंत्रणा कार्यरत झाली.
त्यामुळे यावर्षी १८ फेब्रुवारीलाच ऊसतोडणी पूर्ण झाली. ऊसतोडणी पूर्ण झाल्यानतंर ऊस उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ९०० हेक्टरवरील ऊसतोडणी पूर्ण झाली असून यातून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ३८ टन म्हणजेच एकरी १५.२ टन ऊस उत्पादन आले आहे, तर गेल्यावर्षी हेक्टरी ४५ टन उत्पादन होते. ऊस लागवडीसाठी करावी लागणारी नांगरणी, बियाणे, खते, भरणी याकरिता मोठा खर्च येतो. त्या तुलनेत एकरी येणाऱ्या अल्प उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकरीदेखील अडचणीत आला आहे.
यावर्षी सतत झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर ८ नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस याचा मोठा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. सिंधुदुर्गातील ऊस लागवड क्षेत्रात वर्षागणीक घट होत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी ११६० हेक्टरवर ऊस लागवड क्षेत्राची नोंद होती, परंतु जिल्ह्यात यावर्षी ९०० हेक्टरवर ऊस लागवड झाली होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रात २६० हेक्टरने घट झाली. जिल्ह्यात वैभववाडी, कणकवली तालुक्यांत सर्वाधिक क्षेत्र आहे. याशिवाय मालवण, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत काही प्रमाणात ऊसशेती आहे. जिल्ह्यातील अधिकतर ऊस डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला गाळपाकरिता जातो, तर काही राधानगरी येथेही नेला जातो.
जिल्ह्यात यावर्षी ८ मे पासून पावसाला सुरुवात झाली. मे महिन्यातील पाऊस काही अंशी ऊसाला किफायतशीर ठरला, परंतु त्यानंतर सतत मुसळधार पाऊस झाला. अनेक दिवस ऊसशेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले.
८ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे ऊसाची अपेक्षित वाढ झाली नाही. पावसामुळे जमिनीत ओलावा डिसेंबरपर्यंत राहिला. ऊस गाळप हंगाम सुरू झाला, परंतु जिल्ह्यातील अनेक ऊसशेतीपर्यंत जाताना ट्रक रुतण्याची शक्यता असल्याने ऊसतोडणी विलंबाने सुरू झाली.
यावर्षी जानेवारीमध्ये ऊसतोडणी सुरू झाली. सुरुवातीला अतिशय धीम्यागतीने ऊसतोडणी सुरू होती. अवघ्या पाच-सहा यंत्रणा कार्यान्वित होत्या. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यात ३० ते ४० तोडणी यंत्रणा कार्यरत झाली.
त्यामुळे यावर्षी १८ फेब्रुवारीलाच ऊसतोडणी पूर्ण झाली. ऊसतोडणी पूर्ण झाल्यानतंर ऊस उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ९०० हेक्टरवरील ऊसतोडणी पूर्ण झाली असून यातून केवळ ३५ हजार टन ऊस उत्पादित झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ३८ टन म्हणजेच एकरी १५.२ टन ऊस उत्पादन आले आहे, तर गेल्यावर्षी हेक्टरी ४५ टन उत्पादन होते. ऊस लागवडीसाठी करावी लागणारी नांगरणी, बियाणे, खते, भरणी याकरिता मोठा खर्च येतो.
त्या तुलनेत एकरी येणाऱ्या अल्प उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकरीदेखील अडचणीत आला आहे. यावर्षी सतत झालेला मुसळधार पाऊस, त्यानंतर ८ नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस याचा मोठा परिणाम ऊस उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे.