कवठेमहांकाळ : द्राक्षमाल खरेदी करून एका महिन्यात पैसे देतो, असे सांगून आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनी साडेचौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली.
हा प्रकार मार्च २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२६ कालावधीत घडला.कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.
फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूकघटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. कृष्णदेव पंडित डुबुले (वय ४९) यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी, कुची येथील कृष्णदेव डुबुले यांच्या शेतामधील ९ लाख २६ हजार ५११ रुपये किमतीच्या २१ टन ५८४ किलो द्राक्षमालाच्या ६५६४ पेट्या, तर तात्यासाहेब राजाराम पाटील यांच्या शेतातील १ लाख ९९ हजार ३२० रुपये किमतीचा ४ टन ९८० किलोग्रॅम मालाच्या १२४५ पेट्या व मुरारराव ज्ञानदेव पाटील यांच्या शेतातील ३ लाख २३ हजार ४०० रुपये किमतीचा ९ टन २४० किलोग्रॅम द्राक्षमालाच्या २३१० पेट्या असा माल साई फ्रुट कंपनीने (रावलपालम) खरेदी घेतला होता. खरेदी केलेल्या द्राक्षमालाचे १४ लाख ४९ हजार २३१ रुपये एका महिन्यानंतर पैसे देतो, असे माल घेतला होता.
Kolhapur Liquor Seized : जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर इंग्लिश दारूचा नजराणा! कोल्हापुरात येणारा सव्वा कोटीचा माल जप्तसाई फ्रुट कंपनीचे (रावलपालम, आंध्र प्रदेश) मालक सिरगम रमेश, सिरगम कोंडलराम व त्याचे वडील सिरगम मुरली कृष्णा यांनी फिर्यादी व शेतकरी यांना पैसे आजपर्यंत न देता त्यांची फसवणूक केल्याने त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.