T20 WC 2026 Semi Final : वेस्ट इंडिजच्या विजयाने भारताचं टेन्शन वाढलं, आता सर्वस्व दक्षिण अफ्रिकेवर अवलंबून
admin February 24, 2026 01:25 AM
[ad_1]

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण अफ्रिकेपेक्षा वरचढ ठरला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण आता उपांत्य फेरीचं गणित आणखी किचकट झालं आहे. त्यामुळे भारताला आता सर्वस्वी दक्षिण अफ्रिकेवर अवलंबून राहावं लागणार आहे. कारण वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला आहे. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350 इतका आहे. त सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे भारताचं नेट रनरेट हा -3.800 झाला होता. त्यामुळे नेट रनरेट सुधारण्याचं मोठं टेन्शन भारतीय संघावर होतं. आता त्यात आणखी भर पडली आहे. कारण नेट रनरेटच्या बाबत वेस्ट इंडिजचा संघ बराच पुढे निघून गेला आहे. तिथपर्यंत नेट रनरेट कव्हर करणं काही सोपं नाही. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित खूपच किचकट झालं आहे. खरं तर आता दक्षिण अफ्रिकेने सर्व सामन्यात विजय मिळवावा यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.

दक्षिण अफ्रिकेने तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर..

दक्षिण अफ्रिकेने पहिल्या सामन्यात भारताचा 76 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे आता भारताच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाला तर उर्वरित दोन सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवणं भाग आहे. दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेचा पराभव करावा असंच म्हणावं लागणार आहे. त्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं तरच भारताला उपांत्य फेरीची संधी मिळेल. अन्यथा भारताचं कठीण होईल. कारण वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर नेट रनरेटचं टेन्शन राहणार नाही. नाही तर भारताला सुपर 8 फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल. कारण दोन्ही संघांचा नेट रनरेट हा भारतापेक्षा खूपच चांगला आहे. हा रनरेट मोडणं काही सोपं काम नाही.

भारतीय संघाला काय करावं लागेल?

भारतीय संघाला आता उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. भारताचे पुढचे सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी आहे. पहिला सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. झिम्बाब्वेला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. तर नेट रनरेट काही अंशी सुधारेल. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केलं. तर सर्व गणित 1 मार्चला होणाऱ्या भारत वेस्ट इंडिज सामन्यावर येईल. कारण वरचं गणित जुळून आलं तर या सामन्यात विजयी संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. म्हणजेच भारताने हा सामना जिंकला तर उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण अफ्रिका हे संघ असतील.

दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला तर…

वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका सामन्यावर भारताच्या आशा टिकून आहेत. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव झाला तर भारताच्या स्पर्धेतून आऊट होण्याची शक्यता अधिक असेल. टीम इंडियाला झिम्बाब्वेकडून शेवटची आशा राहील. झिम्बाब्वेने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं तर मग भारताला संधी मिळू शकते. आता पुढे काय होते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.