जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील छत्रू भागात एक थरारक ऑपरेशन यशस्वी झालं आहे. भारतीय सेनेने तीन दहशतवाद्यांना ठार केलं आणि या यशात मुख्य हिरो आहे एक चार पायांचा शूर योद्धा आर्मी डॉग टायसन!
ऑपरेशन ट्राशी 1 अंतर्गत 18 जानेवारीपासून सुरू असलेल्या मोहिमेत 36 दिवसांनंतर हे मोठे यश मिळाले. घनदाट जंगल, बर्फाच्छादित डोंगर आणि खडकाळ रस्त्यांत लपलेले दहशतवादी शोधण्यासाठी सेना, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त कारवाई केली. माहिती मिळाली होती की नैदगाम-वाणीपुरा (पासरकुट) परिसरात जैश ए मोहम्मदचे दहशतवादी एका तात्पुरत्या झोपडीत दडले आहेत.
Photos : 35 कोटी वर्षे दुर्मिळ 'हसणारा' दगड! ज्याला समजलं होतं नकली दात; तो निघाला प्राचीन जीव, जगभर फोटो व्हायरलयावेळी पुढे सरसावला टायसन.. 2 पॅरा स्पेशल फोर्सेसचा हा प्रशिक्षित जर्मन शेफर्ड कुत्रा शांतपणे पुढे गेला. शत्रूच्या लपण्याच्या जागेजवळ पोहोचताच त्याने हालचालींद्वारे सैनिकांना संकेत दिले की “आत आहेत!” दहशतवादी घाबरले आणि गोळीबार सुरू केला. पहिलीच गोळी टायसनच्या पायाला लागली. रक्त येऊ लागले, दुखापत झाली पण टायसन थांबला नाही. तो खचला नाही पुढे सरकत राहिला आणि दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण पक्के केले.
Polluted Country : जगातले टॉप 5 घाणेरडे देश कोणते? भारताचा नंबर पाहून डोकं फिरेल; धक्कादायक रिपोर्टने जगभर गोंधळया धाडसामुळे सैनिकांना अचूक हल्ला करण्याची संधी मिळाली. जलद कारवाईत रॉकेट आणि गोळीबाराने झोपडी उध्वस्त केली. मोठ्या स्फोटानंतर शोध घेतला असता तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यात जैश ए मोहम्मदचा कुख्यात कमांडर सैफुल्लाहचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्यावर 10 लाखांचे बक्षीस होते. दोन AK 47 रायफल्स आणि मोठा शस्त्रसाठा जप्त झाला. टायसनला ताबडतोब उधमपूरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Viral Video : लिफ्टमध्ये अडकल्या दोन लहान मुली! चिमूकलीने स्वतःला धोक्यात घालून वाचवला त्यांचा जीव, ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरलत्याची प्रकृती स्थिर आहे आणि उपचार सुरू आहेत. नॉर्दर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी या यशाचे कौतुक केले आणि दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. टायसनने दाखवून दिले की खरा शूर योद्धा गणवेशात नसतो तर निष्ठेत आणि धैर्यात असतो. चार पायांवर उभे राहूनही तो भारताच्या रक्षणासाठी लढला..असा हा थरारक किस्सा आहे एका कुत्र्याच्या शौर्याची गाथा, जी प्रेरणा देत राहील.