साखरपा-कनकाडीमध्ये स्वच्छता अभियान
esakal February 24, 2026 09:45 AM

rat22p26.jpg-
26488
साखरपा : ग्रामपंचायत आवारात स्वच्छता करताना ग्रामस्थ.
----------
कनकाडीमध्ये स्वच्छता अभियान
साखरपा, ता. २३ ः केंद्रशासनातर्फे आयोजित हिंद दी चादर आ कार्यक्रमांतर्गत कनकाडी ग्रामपंचायती अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी घुले उपस्थित होते. ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर गावातील वरची गुरववाडी शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा अशा स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी पदवीधर शिक्षक मुकुंद वाजे यांनी विद्यार्थ्यांना गुरु तेगबहाद्दुर सिंग यांची माहिती दिली. आरोग्य विभागातर्फे गावातील बौद्धवाडी येथील उपकेंद्रात आरोग्य शिबिर झाले.
शिबिरात वाडीतील तसेच आसपासच्या वाड्यांमधील ज्येष्ठ नागरिक, महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला ग्रामसेवक वैभव शिंदे, संगणक परिचालिका, ग्रामपंचायत माजी सदस्या रेवती पंडित, माजी सदस्य विलास सुकम, कोतवाल श्रीरंग जाधव, नाना गराटे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.