'बिग बॉस'मराठीच्या घरात जाणं म्हणजे...'; एलिमिनेट झाल्यानंतर खान्देश किंग सचिन कुमावतची पहिली पोस्ट VIRAL
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क February 24, 2026 09:43 AM

Marathi Bigg Boss Season 6 Sachin Kumawat Post: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन ऐन रंगात आला आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. अशातच दर आठवड्याला स्पर्धेत मोठा ट्वि्स्ट पाहायला मिळतो. अशातच सहाव्या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घराचा निरोप कोण घेणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली. पण, सहाव्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशननं अनेकांना धक्का बसला. घरातला 'चांगला माणूस' म्हणजेच. खान्देश किंग सचिन कुमावत (Khandeshking Sachin Kumawat) घराबाहेर पडला. सचिन एलिमिनेट होणार हे पाहून घरातील इतर स्पर्धकांच्या अश्रुंचा बांध फुटला. सचिन कुमावतचं एलिमिनेशन घरातील अनेकांसाठी हा धक्का होता. 

खान्देश किंग सचिन कुमावत घराबाहेर येताच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बिग बॉस मराठीमधला सहा आठवड्यांचा प्रवास माझ्यासाठी खास होता, असं सचिननं म्हटलं आहे. तसेच, त्याच्या बिग बॉसच्या घरातल्या प्रवासात दिलेल्या प्रेमासाठी त्यानं मनापासून धन्यवाद म्हटलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arti Sachin Kumavat (@artikumavat1111)

सचिननं सोशल मीडियावर काय पोस्ट केलीय?

खान्देश किंग म्हणून प्रसिद्ध असलेला गायक सचिन कुमवतनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. सचिन कुमावतनं लिहिलंय की, "बिग बॉस मराठीच्या घरात जाणं अनेकांचं स्वप्न असतं. खान्देशातला एक कलाकार ते बिग बॉस मराठी इथपर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी खास होता. एक कलाकार म्हणून 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकलो, तेही कोणाचाही द्वेष न करता, प्रामाणिकपणे खेळत. या संपूर्ण प्रवासात दिलेल्या तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद..." त्यासोबत सचिन कुमावतनं #khandeshking असा हॅशटॅग वापरला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Kumavat (@sachinkumavat1111)

सचिन कुमावतनं ही पोस्ट शेअर करताना लिहिलंय की, "महाराष्ट्रानं दिलेल्या अपार प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद... तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्या... लवकरच पुन्हा भेटू..."

दरम्यान, अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि खान्देशी किंग म्हणून नावारुपाला आलेला सचिन कुमावत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. सचिन बिग बॉसच्या घरात म्हणावा तितका रमला नाही, असं म्हटलं तरी चालेल. मूळचा साध्यासुध्या स्वभावाचा सचिन कुमावत बिग बॉसच्या घरात कट-कारस्थान रचण्यात आणि खेळ समजण्यात कुठेतरी कमी पडला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण, घरातील चांगला माणूस अशी ओळख त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करण्यात मात्र सचिन कुमावत यशस्वी ठरला. त्याचं घरातील प्रत्येक स्पर्धकासोबत खूप घट्ट नातं निर्माण झालेलं. पण, घरात स्वतःसाठी स्टँड घेण्यात कमी पडल्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याचा प्रवास संपला. 

Bigg Boss Marathi 6 Sachin Kumavat Eliminate: 'बिग बॉस मराठी'च्या घरातून 'चांगला माणूस' Eliminate; सगळेच सदस्य हमसून हमसून रडले!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.