छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. या मालिकांमधून कलाकार घराघरात पोहोचतात. त्यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. तर काही मालिका प्रेक्षकांच्या विस्मरणात जातात. मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते बनतात. मात्र जेव्हा या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात तेव्हा मात्र चाहत्यांना वाईट वाटतं. अशाच एका गाजलेल्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. नव्या मालिकेसाठी ही मालिका अचानक संपवण्यात आलीये.
कोणती आहे ही मालिका?ही मालिका आहे कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी'. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेली 'इंद्रायणी' मालिका संपली आहे. २५ मार्च २०२४ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता २ वर्षानंतर या मालिकेने निरोप घेतलाय. या मालिकेतील बालकलाकार सांची भोयर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. केदार शिंदे जो पर्यंत ही मालिका करत होते तो पर्यंत प्रेक्षकांचा मालिकेकडे जास्त ओढा होता. मात्र त्यानंतर मालिकेचा दर्जा खालावत गेल्यातची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली होती. तर मालिकेतील मोठ्या इंद्रायणीची भूमिका अभिनेत्री कांची शिंदे हिने साकारली होती. आता या मालिकेने निरोप घेतलाय.
View this post on InstagramA post shared by Kanchi Shinde (@iamkanchishinde)
View this post on InstagramA post shared by Kanchi Shinde (@iamkanchishinde)
मालिकेतील अभिनेत्री कांची हिने गेल्या काही दिवसात पोस्ट करत आपली मालिका संपणार असल्याचं सुचवत होती. अखेर २१ फेब्रुवारी २०२६ रोजी ही मालिका संपली आहे. घाईघाईत या मालिकेची कथा गुंडाळण्यात आलीये. मालिकेचा टीआरपी कमी होताच मात्र नव्या मालिकेसाठी ही मालिका संपवण्यात आल्याचं बोललं जातंय. आता त्याजागी कोणती मालिका सुरू होतेय हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
भीतीने बोबडी वळेल! 'या' इंडोनेशियन Horror सिनेमाने ओलांडल्या भीतीच्या सीमा; YouTube वर रंगलीये याच चित्रपटाची चर्चा