MPs Group: लोकसभा अध्यक्षांचा विश्वास! संजय राऊत, सुप्रिया सुळे, गौरव गोगोई मजबूत करणार भारताचे जागतीक संबंध
Sarkarnama February 25, 2026 09:45 AM

नवी दिल्ली : जगभरातील देशांशी भारताचे राजनैतिक, सांस्कृतिक अन् आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक 'संसदीय मैत्री गट' स्थापन केला आहे. या गटामध्ये सत्ताधारी खासदारांसोबतच इंडिया आघाडीतील महत्वाच्या खासदारांचा समावेश करण्यात आहे. त्यानुसार, संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई हे देखील दौऱ्यावर जाणार आहेत.

Maharastra Government: राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; 7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; फार्मर आयडी प्रक्रिया सुरु

या दौ-यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी २३ विविध प्रकारचे गट तयार केले असून या गटांच्या नेतृत्वाची जबाबदारी काही वरिष्ठ तर काहीशा जुन्या खासदारांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि गौरव गोगोई यांसारखी इंडिया आघाडीतील मंडळींकडं नेतृत्व देण्यात आलं आहे.

Ambadas Danve : अंबादास दानवेंनी बाहेर काढला आणखी एक घोटाळा; 'हिबानामा'च्या आधारे 1150 कोटींची जमीन घशात घालण्याचा डाव! कुठल्या गटाचं कोण करणार नेतृत्व?
  • सुप्रिया सुळे : सिंगापूर

  • श्रीकांत शिंदे : इंडोनेशिया

  • अशोक चव्हाण : अर्जेंटिना

  • प्रफुल्ल पटेल : ब्राझील

  • अरविंद सावंत : मोरोक्को

  • नरेश म्हस्के, संजय राऊत : केनिया

  • रविंद्र वायकर : चिली

  • वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे : बाल्टिक

  • शशी थरूर : फ्रान्स

  • पी. चिदंबरम : इटली

  • के. सी. वेणुगोपाल : पोर्तुगाल

  • मनीष तिवारी : ऑस्ट्रेलिया

  • गौरव गोगोई : फिलिपिन्स

  • कनिमोळी : ग्रीस

  • डेरेक ओब्रायन, अभिषेक बॅनर्जी : अल्जेरिया

  • असदुद्दीन ओवैसी : ओमान

  • अखिलेश यादव : जपान

  • राम गोपाल यादव : इजिप्त

  • संजय सिंह : कॅरिबियन

  • एन. के. प्रेमचंद्रन : मादागास्कर

  • © Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.