उद्योगातील नव्या ‘ट्रेंड्स’वर
स्वरूप भागवत यांचे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ‘रीसेन्ट एआय ट्रेंड्स इन इंडस्ट्री’ या विषयावर स्वरूप भागवत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका येथील उबर कंपनीचे स्टाफ सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर स्वरूप भागवत यांनी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सुरुवातीला प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे तसेच विभागीय सहयोगी प्राध्यापक उपस्थित होते. भागवत हे देवरूख परिसरातील प्रतिभावान अभियंता असून, ते जागतिक स्तरावर उल्लेखनीय प्रगती करत असल्याचे प्राचार्य म्हणाले. त्यानंतर भागवत यांनी इंडस्ट्रीमधील अलिकडच्या एआय ट्रेंड्सवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वास्तविक जगातील एआयचे उपयोग, नवीन शोध आणि भविष्यातील संधींबद्दल मौल्यवान या विषयी माहिती दिली. मजबूत मूलभूत तत्त्वे, समस्या सोडवण्याची कौशल्ये, व्यावहारिक अनुभव आणि सतत शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
---