मुंबई महापालिका 81 हजार कोटींच्या ठेवीपैकी 36 हजार कोटींच्या ठेवी मोडणार, BMC बजेटमध्ये स्पष्ट!
Marathi February 25, 2026 06:25 PM

मुंबई महानगर पालिका अर्थसंकल्पीय अधिवेशन : मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2026) आज सादर होत आहे. या बजेटमधील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. तसंच चित्र आता पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 80952.56 कोटी इतका असणार आहे. 2025-26 च्या तुलनेत यंदा 8.77% नं वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे.  2025-26 चा अर्थसंकल्प 74427.41 इतका अंदाजे अर्थसंकल्प होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मधल्या काळात महापालिका निवडणुका झाल्या नसल्यानं 4 वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर करण्यात आलं. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूण 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाकरेंच्या ठेवी महायुतीनं तोडल्या

मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत असून एकूण ठेवी 81 हजार 449 कोटी 32 लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी 44 हजार 826 कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र, उर्वरित 36 हजार 623 कोटी 09 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई महानगर पालिकेनं पूल बांधणीचं काम घेतलं हाती

मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी 24 कामं पूर्ण झाली असून मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे.

नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोडच्या 6 व्या टप्याचा समावेश आहे.

वर्सोवा दहिसरच्या कोस्टल रोडसाठी एकूण 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2 हजार 650 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील विविध महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, नायर रुग्णालय, वांद्रे कर्करोग रुग्णालय यांच्यासह इतर रुग्णालयांचा समावेश आहे.

मिठी नदीच्या प्रकल्पाची कामे 286.25 कोटीची तरतूद

मुंबई महानगर पालिकेच्या वतीने स्मार्ट वाहनतळ प्रकल्प उभारला जाणार on street आणि off street वाहनतळांची उभारनी PPP तत्वावर करणार आहे यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पमध्ये 6875 कोटी रुपये तरतूद केली आहे. कोस्टल रोडच्या बाजूच्या जागेत मुंबई महानगर पालिका हरित पट्टा निर्माण करणार जवळपास 53 हेक्टर क्षेत्रावर उद्यान आणि विकास केला जाणार यासाठी 950 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू

महाराष्ट्र शासनाकडून करमणूक शुल्कातून दिलेली सूट 30 सप्टेंबरपर्यंतच लागू असणार आहे. त्यानंतर आता महापालिका करमणूक कर वसूल करणार आहे. महाराष्ट्र शासनाकडे याकरता महापालिकेनं शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय.

मुंबईतील फेरीवाल्यांकडे QR कोड आधारित प्रमाणपत्र

मुंबईत फेरीवाल्यांचा विषय चर्चेचा मुद्दा आहे. मुंबईतील फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईतील फेरीवाल्यांकडे QR कोड आधारित प्रमाणपत्र असतील.

अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली असताच आता अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR code आधारित प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र होणार आहे.

मुंबईकरांची निराशा, पुलकोंडी सुटण्याची चिन्हं नाहीतच

मुंबई महानगर पालिकेनं मुंबईतील तब्बल 101 पुलांची बांधणी आणि दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. यापैकी 24 कामे पूर्ण झाली. मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे. त्यामुळे, पुढील 3 वर्षेतरी मुंबईकरांची पुलकोंडीतून सुटका नाही. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून बेस्ट साठी 1000 कोटींची तरतूद

मुंबई महापालिकेकडून बेस्ट साठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सन 2012-13 पासून सातत्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास जानेवारी 2026 पर्यंत 12028.81 कोटी इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य केलं आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून सन 2026-27 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 1000 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

मुंबई महापालिका ग्रीन बॉन्डस् वितरीत करणार

मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्डस् वितरीत केले जाणार आहेत. मुंबईतील विवीध मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा यांकरता निधी उभारण्याकरता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्डस देण्यात येणार आहेत. एकाच वेळी निर्गमीत केलेल्या 1000 कोटींच्या बॉन्डस करता केंद्राकडून 100 कोटींचं अनुदान मिळणार आहे.

मुंबई महापालिका अर्थसंकल्पातील मोठे मुद्दे

  • मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 80952.56 कोटींचा
  • मागच्या वर्षीपेक्षा (74,427 कोटी)  यंदा 6,525 कोटी रुपयांची वाढ
  • BMC यंदा 81 हजार कोटींपैकी 36 हजार 623 कोटींच्या ठेवी मोडणार
  • BMC आरोग्य खात्यासाठी 7 हजार 456 कोटींची तरतूद
  • बेस्ट साठी 1 हजार कोटींची तरतूद
  • फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु
  • ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू होणार
  • वर्सोवा दहिसर कोस्टल रोडसाठी  4 हजार कोटींची तरतूद
  • गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2 हजार 650 कोटींची तरतूद
  • मनपा रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटींची तरतूद
  • 40 बाय 40 पेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना बंदी;
  • पदपथ आणि गच्चीवरील जाहिरातींनाही मनाई
  • राज्य शासनाकडे बीएमसीचे एकूण 10,948.58 कोटींची थकबाकी

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.