मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2026’ . यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘मराठी गाजलंच पाहिजे’ या विशेष थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा ठसा, परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेची सुंदर सांगड अनुभवायला मिळाली. संपूर्ण मंचावर मराठीचा आवाज घुमला आणि मराठी कलेचा सन्मान अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत अनेक मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा दोन मराठी चित्रपटांनी हा पुरस्कार सोहळा गाजवला. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षक-समिक्षकांच्या पसंतीस उतरले होते.
दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ या चित्रपटाने ‘ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर’चा पुरस्कार आपल्या नावे केला असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही या दोन्ही चित्रपटांमधील कलाकारांमध्ये विभागून देण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर आणि भरत जाधव यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. ‘दशावतार’ने 3 तर ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने 4 पुरस्कार पटकावले आहेत.
पुरस्कार विजेत्यांची यादी-
View this post on Instagram
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)
यंदाच्या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधलं. विविध श्रेणींमध्ये या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. झी चित्रगौरव पुरस्कार 2026 हा केवळ पुरस्कार सोहळा नसून मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि कलेचा उत्सव ठरला. ‘मराठी गाजलंच पाहिजे’ हा संदेश अधिक ठामपणे देत हा सोहळा प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला. मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विश्वास या सोहळ्याने पुन्हा एकदा दृढ केला. हा भव्य सोहळा प्रेक्षकांना शनिवारी 14 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.