फराह खानच्या नवऱ्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन ! डिट्टो कार्तिक आर्यनची कॉपी..नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क February 26, 2026 03:43 PM

Farah khan Husband fitness transformation: फराह खानचे पती आणि चित्रपट निर्माते शिरीष कुंदर (Shirish Kundar) सध्या त्यांच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या नव्या लुकने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली आहे. अलीकडेच शिरीष यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये त्यांचा पूर्ण बदललेला अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत .

काही फोटोमध्ये ते शर्टलेस दिसत आहेत, तर काहींमध्ये स्टायलिश सूटमध्ये अतिशय फिट आणि स्मार्ट लुकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा नवा अवतार पाहून अनेकांना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

सोशल मीडियावर एकच चर्चा

सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगली आहे. अनेक चाहते त्यांच्या फिटनेसचं कौतुक करत त्यांना “एजिंग बॅकवर्ड” म्हणत आहेत. तर काही जण हा बदल खरा आहे की फोटोशॉप किंवा AIची करामत, असा सवाल उपस्थित करत आहेत. काही नेटिझन्सचं तर म्हणणं आहे की वजन घटवल्यानंतर शिरीष काही फोटोंमध्ये कार्तिक आर्यन सारखे दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, एका फोटोमध्ये शिरीष बिझनेस क्लास फ्लाइटमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसले. या फोटोवर त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर-दिग्दर्शिका फराह खान हिने मजेशीर कमेंट केली. “कुठे निघालायस?” तिच्या या कमेंटमुळे चर्चेला आणखी उधाण आलं. शिरीष कुंदर हे नेहमी लाइमलाइटपासून दूर राहिले आहेत. त्यांनी ‘मैं हूं ना’ आणि ‘जोकर’सारख्या चित्रपटांत एडिटिंग व दिग्दर्शन केलं आहे. मात्र यावेळी ते त्यांच्या कामामुळे नव्हे, तर नव्या लुकमुळे चर्चेत आले आहेत. आता त्यांचा हा ट्रान्सफॉर्मेशन खऱ्या मेहनतीचा परिणाम आहे की तंत्रज्ञानाची जादू, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.