जया बच्चन यांच्यामुळे नातवाला आयुष्यभराचा फटका? थेट लागली वाट, जया स्पष्ट म्हणाल्या, माझ्या नातवाला…
Tv9 Marathi February 26, 2026 03:45 PM

बॉलिवूडमधील सर्वात टॉपचे घराणे कोणते असेल तर ते आज बच्चन फॅमिली आहे. अमिताभ बच्चन गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसत आहेत. जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन असे कुटुंबातील सर्वच सदस्य बॉलिवूडमध्ये धमाका करताना दिसत आहेत. आता बच्चन कुटुंबाची तिसरीही पिढी बॉलिवूडमध्ये धमाका करण्यास सज्ज आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये काम करतोय. मात्र, म्हणावे तसे यश त्याला अजिबातच मिळत नाहीये. अगस्त्य आजोबा, आज्जी, मामा आणि मामी सारखे बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमिताभ बच्चन स्वत: अगस्त्य नंदा याच्या चित्रपटाचे प्रमोशन करतानाही दिसले. मात्र, अगस्त्यच्या चित्रपटांना अजिबात धमाका करता येत नाही. याचा दोष थेट जया बच्चन यांना दिला जात आहे. जया बच्चन यांच्या स्वभावाला फटका अगस्त्यला बसल्याचे बोलले जात आहे, त्यावरच आता जया बच्चन स्पष्ट बोलताना दिसल्या.

जया बच्चन आणि पापाराझी यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच पापाराझींबद्दल धक्कादायक विधान केले होते, ज्यानंतर संतापाचे वातावरण झाले. थेट पापाराझींच्या पॅन्टबद्दल त्यांनी भाष्य केले. मात्र जया बच्चन यांचे हे बोलणे कोणालाही पटले नाही. जया बच्चन यांचे पापाराझींसोबतच्या वागण्यामुळे अगस्त्य नंदा याच्या करिअरवर वाईट परिणाम झाल्याचे बोलले जाते.

2023 मध्ये द आर्चीज चित्रपटाच्या माध्यमातून अगस्त्य याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. 2026 मध्ये त्याचा इक्कीस चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, अगस्त्य नंदाच्या दोन्ही चित्रपटांना धमाल करण्यात यश मिळाले नाही. आता अशी चर्चा सुरू आहे की, जया बच्चन यांच्या स्वभावाचा आणि लोकांसोबतच्या व्यवहाराचा परिणाम अगस्त्य नंदा याच्या करिअरवर होत आहे.

यावरजया बच्चन यांनी स्पष्टपणे आता भाष्य केले. जया बच्चन यांनी म्हटले की, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती माझ्या नातवाचे भाग्य बदलू शकत नाही. अगस्त्य स्टार बनणार आहे आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देत म्हटले की, ते स्टारडमच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांना जवळजवळ 15 वर्षे प्रेसने बंदी घातली होती, त्याचा काही परिणाम त्यांच्या करिअरवर झाला? जया बच्चन यांनी स्पष्ट केले की, त्यांचे पापाराझींसोबत असलेल्या नात्याचा अगस्त्याच्या करिअरवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुळात म्हणजे अगस्त्याचे प्रेससोबत वेगळे नाते आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.