कागल : भरवस्तीत असलेल्या बोभाटे बंधूंच्या चिरमुरे - फरसाण भट्टीला रात्री भीषण आग लागली. यात भट्टी आणि गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. कागल अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
या आगीत सुमारे सात लाखांहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथील ब्रह्मपुरीत नंदकुमार बोभाटे आणि प्रकाश बोभाटे या बंधूंची चिरमुरे-फरसाण भट्टी आहे.
Rajendranagar Fire : राजेंद्रनगरात झोपड्या पेटविल्या; पूर्ववैमनस्यातून प्रकार, साहित्य जळून खाकसिमेंट काँक्रिटची तीन मजली ही इमारत असून, तळमजल्यावर भट्टी आहे. वरच्या दोन मजल्यांवर चिरमुरे, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच तयार माल ठेवला आहे.
कागल पोलिस ठाण्याच्या समोरील बोळात, दाटीवाटीने बसलेल्या लोकवस्तीत ही भट्टी आहे. सायंकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे भट्टी बंद होती. रात्री आठच्या सुमारास या इमारतीच्या तळमजल्यातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागला. शेजारील नागरिकांनी याची माहिती बोभाटे बंधूंना दिली. तसेच कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला वर्दी दिली.
Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाकइमारतीच्या तळमजल्यावरील भट्टीतील गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे बॅरेल, डबे आणि इतर साहित्य तातडीने बाहेर काढले. तोपर्यंत आगीने मोठं रौद्ररूप धारण केले होते. इमारतीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या.
दरम्यान, कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, दाटीवाटीची वस्ती आणि अरुंद रस्ता यामुळे एकच गाडी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकली. फरसाण आणि इतर खाद्यपदार्थ तयार करणे आणि ते तळण्यासाठी भट्टीत खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
तसेच पदार्थ तळण्यासाठी मोठ्या कढई वापरल्या जातात. खाद्यतेलाचा साठा आणि कढईतील तेलामुळे आगीचा भडका उडाल्याचे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.