GENELIA DESHMUKH NARROWLY ESCAPES FALL: अभिनेत्री जेनिलया देशमुख हिच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे. महाराष्ट्राची वहिनी म्हणून ती प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर सुद्धा जेनिलियाची प्रचंड चर्चा रंगताना पहायला मिळते. ती सुद्धा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिचे आणि रितेशचे मजेशीर व्हिडिओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांची सुद्धा त्यांच्या व्हिडिओला पसंती मिळताना पहायला मिळते.
दरम्यान अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये जेनिलिया एका ठिकाणी जात असताना पाय घसरुन पडता पडता थोडक्यात वाचल्याचं पहायला मिळतय. व्हिडिओ पाहून चाहत्यांनी जेनिलियाबद्दल काळजी व्यक्त केलीय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जेनिलिया कुठेतरी बाहेर जाताना दिसत आहे. त्यावेळी पाय घसरुन ती पडणार होती, परंतु तिने स्वत:ला सावरलं आणि हसत परिस्थिती सांभाळली. सध्या सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओची चर्चा रंगताना पहयाला मिळतेय. अनेकांनी कमेंट्स करत तिच्याबद्दल काळजी व्यक्त केलीय. अनेकांनी तिला सावकाश बघून चालण्याचं आवाहन केलय.
View this post on InstagramA post shared by Instant Bollywood (@instantbollywood)
दरम्यान जेनिलियाबद्दल बोलायचं झालं तर ती आगामी प्रोजेक्ट राजा शिवाजीमुळे चर्चेत आहे. जेनिलाया या सिनेमाची निर्माती आहे. तिचा हा सिनेमा 1 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची मोठी चर्चा आहे.
'चार दिवस सासूचे पेक्षा भुवनेश्वरीसाठी जास्त मेहनत घेतली' कविता मेढेकर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेबद्दल बोलताना म्हणाल्या...