पंढरपूर: पंढरपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची तब्बल सहा कोटी 50 लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाने तगादा लावला आहे.
Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!सात दिवसांमध्ये थकीत पाणी पट्टीची रक्कम भरा अन्यथा पाणी पुरवठा बंद जाईल अशी नोटीसही जलसंपदा विभागाने पालिकेला दिली आहे. पालिकेने वेळेत थकबाकी वेळेत भरली नाही, तर ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शहरातील नागरिकांवर जल संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील चार ते पाच वर्षांपासून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे जलसंपदा विभागाची सुमारे सहा कोटी 50 लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने नगरपालिकेला वेळोवेळी तोंडी व लेखी कळवले आहे. त्यानंतर नगरपालिकेने काही रक्कम भरली आहे. तथापी थकीत रक्कम मोठी असल्याने जलसंपदा विभागाने थेट पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारो भाविक येतात. येणार्या भाविकांची व शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने वेळेत तोडगा काढावा अशी मागणी माजी पाणी पुरवठा समितीचे सभापती विक्रम शिरसाट यांनी केली आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी आज पाणी पुरवठा बंद करण्यासाठी आले होते. परंतु आम्ही त्यांना मार्च अखेर पर्यंत टप्प्या टप्प्याने थकबाकी भरण्याची विनंती केली आहे असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
Satara News: पाचगणीत ‘ईडी’ची कारवाई! मनी लाँडरिंगप्रकरणी जुनैद मेमन यांच्या तीन मिळकती ताब्यात; गुप्तता अन् माहिती देण्यास टाळाटाळ!नगरपालिकेकडे मागील चार ते पाच वर्षांपासून सुमारे साडेसहा कोटी रूपये पाणीपट्टीची थकबाकी आहे. थकीत रक्कम भरण्यासंर्भात वेळोवेळी नगरपालिकेला लेखी कळवले आहे. तरीही थकीत रक्कम भरली नाही. सात दिवसांची मुदत दिली आहे.मुदतीमध्ये थकीत रक्कम भरली नाही तर पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई केली जाईल असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश कथले यांनी स्पष्ट केले आहे.