Ajit Pawar Plane Crash: चुकून की मुद्दाम? खराब विमान… रोहित पवारांचा अजित दादांच्या विमान अपघात प्रकरणी गौप्यस्फोट
Tv9 Marathi February 26, 2026 08:45 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात झाला. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित दादांच्या विमानात बिघाड झाला आणि लँडिंग दरम्यान अपघात झाला. या अपघातात अजित दादांसोबत विमानात असलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात असल्याच्या संशयावरून वातावरण तापले आहे. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवार करत आहेत.

काल रोहित पवार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने वातावरण आणखी तापले. आज रोहित पवार हे बारामती येथे गेले. बारामती पोलिसांसोबत झालेल्या बैठीकीनंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या विमानाबाबत गौप्यस्फोट केला आहे. अजितदादांना खराब विमान का दिलं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

“अजितदादांना खराब विमान का दिलं?”

रोहित पवार म्हणाले, “हे विमान व्हिएसआर कंपनीकडे किती विमाने आहेत. सात होती. त्यातील एकातून दादा प्रवास करत होते. २०२४ ला दुसरे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. पाचही विमान राहिले. डीजीसीएने उरलेले पाच विमान उड्डाणास बंदी घातली. याचा अर्थ नॉन कंप्लायन्स होता. मी सर्वांना प्रश्न करतो. जर पाच विमाने बंद आहेत. तर मग अजितदादांना खराब विमान का दिलं. चुकून दिलं की मुद्दाम दिलं याचा एफआयआर करण्यासाठी आलो होतो. हा एफआयआर व्हिएसआर कंपनीच्या विरोधात, मालकाच्या विरोधात आहे. कोण अधिकारी आहे जे विमान चांगल्या कंडिशनमध्ये आहे हे सांगणारे अधिकारी कोण होते. त्यांना शोधा हे सांगण्यासाठी एफआयआर करण्यासाठी आलो होतो.”

“अॅरो नावाच्या कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी”

पुढे ते म्हणाले, “विमान कोणतं द्यायचं. आणि व्हिजीबिलीटी व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्याचं काम अॅरो नावाच्या कंपनीचं आहे. पवार नावाच्या अॅरो कंपनीच्या व्यक्तीने वातावरण ओके आहे हे सांगितलं. त्यानंतर दादा विमानात बसले. त्यामुळे अॅरो नावाच्या कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या व्हॅट्सअपवर चॅट झाली. त्या चॅटवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी अधिकारी आहे. त्यांना सरकार पैसे देते. त्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष केलं. त्यामुळे दुर्घटना घडली. त्या ग्रुपमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.