Holi 2026 Morning Rituals: होळीच्या दिवशा सकाळी करा 'हे' खास उपाय, वर्षभर घरात नांदेल सुख-समृद्धी
esakal February 26, 2026 10:46 PM

Holi morning rituals: हिंदू धर्मात होळी हा फक्त उत्सव नाही तर आनंदी लोकांचे प्रतीक आहे, उलट हे नकारात्मकतेचे निराकरण जीवनात सकारात्मकता ही एक विशेष संधी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार होळीच्या दिवशी केलेले काही उपाय फायदेशीर ठरु शकतात. यंदा होळी ३ मार्चला साजरी केली जाणार आहे. वर्षभर घरात सुख-समृद्धी राहण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.

पहाटे स्नान आणि पूजा करा

होळाच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर गंगाजळ घरातील कोपऱ्यात सिंपडावे. घरातील मंदिरात दिवा लावावा. मान्यतेनुसार यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते.

धनप्राप्तीसाठी

एका लाल कपड्यात हळद, कवडी आणी चांदीचं नाणे बांधून घरातील तिजोरीत ठेवा. धार्मिक मान्यतेनुसार असे करणे शुभ मानले जाते आणि आर्थिक समस्या कमी होतात.

तूळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे

होळीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुळशीच्या रोपाला पाणी घालावे. तुळशीचे रोप भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे मनोभावे पूजा केल्यास आर्थिक समस्या कमी होते.

मुख्य प्रवेशदारासाठी उपाय

तुम्ही होळीच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुलालचा स्वस्तिक बनवू शकता. घरातमध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि प्रेम वाढते.

Holi 2026: बाजारातील चिप्स विसरा! होळीला पाहुण्यांसाठी घरीच बनवा टेस्टी बटाटा चिप्स राखीचा उपाय

होळीदहनानंतर राख घरी आणून सुरक्षित ठेऊ शकता. ही राख वाईट नजरेपासून रक्षण करते. तसेच कुटूबातील सदस्यांचे रक्षण करते आणि प्रगती होते.

मिठाई

होळीच्या दिवशी गरजूंना रंग, मिठाई किंवा वस्त्र दान करु शकता. यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.