Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक
esakal February 27, 2026 01:45 AM

कोल्हापूर : जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या ए. एस. ट्रेडर्स व तिच्या उपकंपनीचा संचालक संतोष नंदकुमार कुंभार (वय ४१, रा. दत्तनगर, पलूस, सांगली) याला अटक झाली. गुन्ह्यातील एकविसावा संशयित अटक झाली असून, तो तीन वर्षांपासून पसार होता.

गुन्ह्यात ५३ कोटींची फसवणूक निष्पन्न झाली असून, संचालकांकडून २५ कोटींच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आयआरबी कंपनीकडे लिपिकाचे काम करणारा संशयित संतोष कुंभार हा ए. एस. ट्रेडर्सचा मुख्य संचालक लोहितसिंग सुभेदार यांच्या संपर्कात आला.

Thane Fraud: ठाण्यात ५०० कोटींचा घोटाळा, ११ हजार जणांची फसणवणूक; मालकासह तिघे अटकेत

दोघेही पलूसमध्ये एकाच भागात राहण्यास आहेत. सुभेदार याने त्याला त्याच्या उपकंपनीत संचालक म्हणून नेमले. २०१९ पासून तो ट्रेडविंग या ए. एस. ट्रेडर्सच्या उपकंपनीचे काम पाहत होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पलूसमधून पसार झाला होता. या काळात मुंबई, पनवेल भागात राहत होता. त्याचा मोबाईल बंद असल्याने तो सापडला नव्हता. दरम्यानच्या काळात त्याने पनवेल येथील बॅंक खाते काढले होते.

Investment Fraud : गुंतवणुकीचे आमिष दाखवून, ४८ लाखांची फसवणूक; तहसील पोलिस ठाण्यात ठकबाज युवकाविरोधात गुन्हा दाखल

या खात्यावर व्यवहार पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. त्याला पनवेलमधून पकडण्यात आले. एकविसावा संशयित ताब्यात

६७३ गुंतवणूकदारांची सुमारे ५३ कोटी ८४ लाखांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे. न्यायालयाने याप्रकरणात करवीर प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करून मालमत्ता जप्तीचे आदेश दिले होते.

यानुसार आतापर्यंत २५ कोटींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २० संशयितांना अटक झाली असून, त्यातील तिघांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.