पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेखला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. शिवाय भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख (Pune Crime News) आणि आयान शेख यांचा तो चुलता आहे, दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांचा तो अत्यंत जवळचा कार्यकर्ता असल्याचा आरोप देखील भिगवण प्रकरणातील तरुणीच्या कुटुंबाकडून केला जात होता आणि याला अनुसरूनच हिंदू समाजाकडून अझर शेखच्या अटकेची (Pune Crime News) मागणी केली जात होती. अझर शेख यासोबत युवराज मेंगावडे याला देखिल पोलिसांनी अटक केली आहे. अवैध वाळू उपसा प्रकरणात अझर शेख याने स्वामी चिंचोली गावाच्या महसूल विभागाच्या तलाठ्याला मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.या गुन्ह्यात तो फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.(Pune Crime News)
तर मिळालेल्या माहितीनुसार, भिगवणमधील तरूणीचं कथित अपहरण प्रकरण चर्चेत आलं त्या प्रकरणातील तरुण आणि तरुणी ज्यावेळी बारामती शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्याच्या काही तास आधी अझर शेख याने सोशल मीडियावर एक स्टेटस अपलोड केलं होतं. 'सदैव एकनिष्ठ' असं त्यांनी स्टेटसमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे भिगवण प्रकरणात तरुण-तरुणीला पळवून लावण्यात त्यांचाच हात असल्याचा दावाही केला जात आहे. तसेच त्यांच्यावर दौंड परिसरातील विविध प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. अझर शेखला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. (Pune Crime News)
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी आपल्या आई आणि भावासह लग्नाच्या खरेदीसाठी गेली असताना, तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचं अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी तरुणीने कोर्टात येऊन जबाब नोंदवला आहे. आपलं संबंधित तरुणावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेलो होतो, असा जबाब तरुणीनं कोर्टात दिला आहे. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचं सांगितलं.
त्यानंतर पीडित तरुणीला सुधारगृहात पाठवण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव तिची रवानगी सुधारगृहात केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. आता या भिगवण कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट आला, बारामती पोलीस ठाण्यात आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मुलीनं आता तिचा जबाब बदलला आहे. भिगवण प्रकरणातील मुलीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भिगवण प्रकरणातील मुलगी मुस्लीम समाजातील तरुणासोबत 17 फेब्रुवारी रोजी निघून गेल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. भिगवणमधून निघून गेल्यानंतर बारामती पोलीस स्टेशनला 20 फेब्रुवारीला तरुणासह हजर झाली होती.
भिगवण अपहरणात प्रकरणातील तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर आपल्याला आईकडे आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे. 20 फेब्रुवारी रोजी बारामती सत्र न्यायालयासमोर या तरुणीने आपण आईसोबत जाणार नसून जहीर शेख सोबतच जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हीसीद्वारे या प्रकरणातील सुनावणी पार पडली. पुन्हा आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयाने संबंधित तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काही प्रश्न विचारले. यावेळी संबंधित तरुणींना आई आणि मामा सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
मुलीची आई बारामती पोलीस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे भिगवण घटनेतील मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली होती. सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने मुलीला कोणाकडे जायचे असे विचारले असता मुलीने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
भिगवण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भिगवण प्रकरणातील तरुणीनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंदापूर कोर्टात मुलीला व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे हजर केलं असता मुलीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भिगवण प्रकरणातील मुलीने आज कोर्टात जबाब बदलला आहे. संबंधित मुलगी या अगोदर तरुणासोबत राहण्यावर ठाम होती. मात्र, बारामती पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तिनं तरुणासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर संबंधित तरुणीला सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भिगवण प्रकरणातील तरुणीनं आज कोर्टात आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी बारामती कोर्टात हजर केल्यानंतर मुलीला पाच दिवस पुनर्वसन केंद्रात सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज कोर्टात हजर केला असता तिनं आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.