Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव
esakal February 28, 2026 12:46 AM

Gold Silver Price Today: काल झालेल्या किंचित घसरणीनंतर आज जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. स्पॉट मार्केटमधील मागणी, डॉलरची कमजोरी आणि जागतिक तणावामुळे सोन्याला आधार मिळाला आहे.

सराफा बाजारात सोन्याचा भाव

Goodreturns च्या आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,61,720 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेटचा भाव 1,48,250 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 1,21,330 रुपये आहे.

सराफा बाजारात चांदीचा भाव

Goodreturns च्या आकडेवारीनुसार, देशातील सराफा बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी चांदीचा भाव 2,85,000 प्रती किलो इतकाच आहे. चांदीच्या सर्वकालीन उच्चांकापासून आजूनही चांदी 1.35 लाख रुपयांनी स्वस्त आहे.

महाराष्ट्रातील भाव

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव आदि शहरांमद्धी 24 कॅरेटचा भाव 550 रुपयांनी वाढून प्रति तोळा 1,61,570 रुपये इतका झाला आहे, तर दागिने बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 22 कॅरेटचा भाव प्रति तोळा 1,48,100 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 1,21,180 रुपये आहे.

दरम्यान, आजही राज्यभर चांदीचा भाव प्रति किलो 2,85,000 रुपये इतका आहे.

सोन्याच्या भावावर परिणाम करणारे घटक
  • कमकुवत अमेरिकन डॉलर – डॉलर कमजोर झाल्यास इतर चलनधारक गुंतवणूकदारांसाठी सोने स्वस्त पडते, त्यामुळे मागणी वाढते.

  • आयात शुल्क वाढीची शक्यता – अमेरिकेकडून काही देशांवर टॅरिफ 10% वरून 15% किंवा अधिक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढू शकते.

  • व्याजदर कपातीची अपेक्षा – बाजाराला यंदा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून ती 0.25% दरकपात होण्याची शक्यता वाटते. व्याजदर कमी झाल्यास सोन्यात गुंतवणूक वाढते.

  • अमेरिकेतील रोजगार आकडेवारी – साप्ताहिक जॉबलेस क्लेम्स डेटा जाहीर होणार असून त्यावरून पुढील आर्थिक धोरणाचा अंदाज घेतला जाईल.

अमेरिका–इराण तणाव आणि आता पाकिस्तान-अफगाण संघर्ष सुरू असल्यामुळे जागतिक तणाव कायम असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.