Arshdeep Singh: गोलंदाजांनी कणखर होण्याची गरज; अर्शदीप सिंग, दवात गोलंदाजी करण्यासाठी ओल्या चेंडूवर सराव
esakal February 28, 2026 02:45 PM

चेन्नई : या विश्वकरंडक स्पर्धेत भारताची कामगिरी अगदी सर्वोत्तम झालेली नसली तरी सहा पैकी पाच सामने जिंकलो आहोत. संघामधील विश्वास कायम होता. गेल्या काही सामन्यांत खेळपट्टी वेगळी होती. चेन्नईची खेळपट्टी भिन्न होती.

आमच्या फलंदाजांना खेळताना मजा येत असेल, तर गोलंदाज म्हणून आव्हान स्वीकारायला आणि काही धावांचा मार खायला आम्ही तयार होतो, असे या सामन्यात तीन विकेट मिळवणाऱ्या अर्शदीप सिंगने सांगितले.

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

टी-२० क्रिकेट फलंदाजांकडे झुकलेला असतो. गोलंदाजांना मनातून कणखर व्हावे लागते. कधीकधी दव पडल्यावर चेंडू ओला होतो. त्याचा सराव करत राहायला लागते. सरावात चेंडू मुद्दाम ओला करून आम्ही गोलंदाजी करतो. सामन्यात चेंडूची शिवण कोरडी असेल याचा लक्षपूर्वक विचार करतो, बाजू समजावून सांगताना अर्शदीप म्हणाला. या विश्वकरंडक स्पर्धेत बुमरापेक्षा अर्शदीपला जास्त फलंदाजांना बाद करता आले आहे, असे सांगता अर्शदीप गालातल्या गालात हळूच हसला.

हे खरे असले तरी बुमरा पाजींची क्षमता काय आहे. सगळ्यांना कल्पना आहे. माझे नशीब आहे की बुमरा, सिराज आणि हार्दिक माझे गोलंदाजी करतानाचे भागीदारी असतात. कप्तान मला कठीण षटके टाकायला हक्काने बोलावतो याचे समाधान मिळते. याचा अर्थ संघ माझ्याकडून मोठ्या अपेक्षा करतो आहे, असा विचार मी करतो, असे त्याने सांगितले.

T20 World Cup: विजयाचा 'रिमोट कंट्रोल' गोलंदाजांच्या हातात! इरफान पठाणने उलगडले टी-२० मधील गोलंदाजीचे गुपित आफ्रिकेचा सामना पाहिला...

गुरुवारी भारताच्या सामन्याअगोदर दुपारच्या सामन्यावरसुद्धा सगळ्यांची नजर होती ना, असे विचारता अर्शदीप म्हणाला, म्हणजे काय शंकाच नाही. पूर्णवेळ नाही, पण काही काळ सगळेच काय चालू आहे लक्ष ठेवत होते. मी माझ्या वडिलांसोबत माझ्या खोलीत तो सामना बघत होतो. वेस्ट इंडीज संघाने सुरुवातीच्या पडझडीनंतर तोल सावरला. त्यांच्या फलंदाजाने षटकार मारला की माझे वडील अरे काय करतो आहेस तू, असे म्हणत नाराजी व्यक्त करत होते आणि मी त्यांची समजूत काढत होतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.