Indian Women Cricket: महिला संघावर दुसऱ्या पराभवाची नामुष्की; भारताची निराशा, ऑस्ट्रेलियन संघाची मालिकेत आघाडी
esakal February 28, 2026 02:45 PM

होबार्ट : सुमार क्षेत्ररक्षण आणि फलंदाजांच्या अपयशामुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर सलग दुसऱ्या एकदिवसीय लढतीत पराभवाची नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी झालेल्या लढतीत भारतीय महिला क्रिकेट संघावर पाच विकेट व ८३ चेंडू राखून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियन संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियन संघासमोर २५२ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. काशवी गौतम हिने एलिसा हिली हिला सहा धावांवर बाद केले.

INDW vs SLW : केवळ २७ धावा अन् स्मृती मानधना गाठणार ऐतिहासिक पल्ला; श्रीलंकेविरुद्धच्या T20I सामन्यात सुवर्णसंधी

त्यानंतर मात्र सुमार क्षेत्ररक्षणाचा फटका भारतीय महिला संघाला बसला. फोबे लिचफिल्ड व जॉर्जिया वॉल या जोडीने १२१ धावांची भागीदारी करताना भारतीय संघातील गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. क्रांती गौडच्या गोलंदाजीवर फोबे लिचफिल्ड ८० धावांवर बाद झाली. या खेळीमध्ये तिने ११ चौकार व एक षटकार मारले.

India Women Cricket: भारतीय महिला क्रिकेट संघाचे ऐतिहासिक यश; तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी मात टी-२० मालिकेत २-१ने बाजी

जॉर्जिया वॉल हिला तीन जीवदान मिळाले. यष्टीरक्षक रिचा घोष, क्रांती गौड व स्मृती मानधना या खेळाडूंनी प्रत्येकी एक झेल सोडला. याचा फायदा जॉर्जिया वॉल हिने घेतला. तिने ८२ चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी साकारली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.