विज्ञान दिनानिमित्त कुतूहल अन् जिज्ञासा (फोटो फिचर)
esakal February 28, 2026 08:45 PM

विज्ञान दिनानिमित्त कुतूहल अन् जिज्ञासा

भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी भौतिकशास्त्रामध्ये मोठे संशोधन केले. त्यांच्या ‘रामन इफेक्ट’ या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. हे संशोधन त्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केले. त्यांची आठवण म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त चिंचवड येथील सायन्स पार्कला अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतली. अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी कल्पक घरामध्ये प्रयोग केले असून, यामध्ये पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील शाळांचा समावेश आहे. हे प्रयोग रविवारपर्यंत (ता. १) पहावयास मिळणार आहेत. विज्ञानात रुची वाढविणे आणि विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला. त्याचीच ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.