उत्पन्नवाढीसाठी कसरत
पालघर नगर परिषदेकडून मालमत्ता करात वाढ
पालघर, ता. २८ (बातमीदार)ः पालघर नगर परिषदेचा १६ कोटी ८१ लाख ७९ हजार ६६९ शिलकीचा जमाखर्च अर्थसंकल्प विशेष सर्वसाधारण सभेत किरकोळ दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला, तर उत्पन्नवाढीसाठी मालमत्ता कर २० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी २५-२६ चा सुधारित तसेच २०२६-२७ चा मूळ अर्थसंकल्प गुरुवारी सादर केला. या वेळी नगरपालिकेच्या उत्पन्नातून मागासवर्गीय कल्याणासाठी पाच टक्के निधी, महिला बालकल्याण योजना पाच टक्के निधी, दिव्यांग सुविधा ५ टक्के निधीचा समावेश आहे. या वेळी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा शहर स्वच्छ सुंदर दिसावे तेथे जाऊन राहावे. यासाठी मुख्य रस्ते, मुख्य रस्त्यांच्या कडेचा पदपथ, भाजी, मच्छी मार्केट, दुकान गाळे, व्यापारी संकुले, नाट्यगृह, उद्यान बालोद्यान, क्रीडांगणे, संस्कार मंदिर, वाचनालय, दवाखाना, अग्निशमन केंद्र, आकर्षक प्रकाश योजनांसाठीचा निधी संकलनाचे उद्दिष्ट आखले आहे. तसेच पुढील पाच वर्षांत होणाऱ्या कामांवर विशेष भर दिला गेला आहे.
---------------------------
अनावश्यक खर्चाला कात्री
गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ केलेली नाही. आता त्याचे मूल्यांकन करून मालमत्ता कर ४० टक्के वाढविणे आवश्यक असले तरी स्थायी समितीमध्ये सुचविलेल्याप्रमाणे २० टक्के मालमत्ता कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. निधीची उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणे तसेच उत्पन्न कसे वाढता येईल, यासाठी अनावश्यक खर्च टाळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, अर्थसंकल्पात पालघर शहरातील नाट्यगृह ,भाजी मार्केट, मच्छी मार्केटसाठी निधीची तरतूद केली जाणार आहे.
--------------------------
२०२५-२६
मागील शिल्लक - १५ कोटी ४३ लक्ष ६१ हजार ९२४
महसुली जमा - ५८ कोटी ६१ हजार १०१
भांडवली जमा - ७७ कोटी ४६ लक्ष ५८ हजार ३७७
एकूण जमा - १५० कोटी ९० लक्ष ८१ हजार ४०२
--------------------------------
महसुली खर्च - ३९ कोटी ९९ लक्ष २५२२
भांडवली खर्च - ९४ कोटी ९ लक्ष २१२
एकूण खर्च - १३४ कोटी ९ लक्ष १७३४
शिल्लक - १६ कोटी ८१ लाख ७९ हजार ६६९
---------------------
२६-२७ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात
एकूण जमा - ३०४ कोटी ६७ लक्ष ३६ हजार २३
एकूण खर्च - २८३ कोटी २९ लक्ष ५७ हजार ३५१