शिवडी-वरळी पुलावरून सळई पडून तरुण जखमी
esakal March 01, 2026 05:45 PM

शिवडी-वरळी पुलावरून
सळई पडून तरुण जखमी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः शिवडी-वरळी जोडपुलाच्या कामादरम्यान एक लोखंडी सळई खाली पडून २२ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. आचार्य दोंदे मार्ग येथे ही घटना शुक्रवारी (ता. २७) रात्री घडली. गणेश विष्णू बुधाले (२२) असे जखमीचे नाव आहे. त्याला स्थानिकांनी परळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. गणेशची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.