सोन्याच्या किंमती वाढत असताना दागिन्यांवर कर्ज घ्यावं की नको? नेमके काय आहेत धोके?
Marathi March 01, 2026 11:25 PM

इराण-इस्रायल युद्ध: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. जगात जेव्हा जेव्हा युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा गुंतवणूकदार घाबरून सोन्यात पैसे गुंतवतात. ज्यामुळं सोन्याच्या किमती (Gold Price)  झपाट्याने वाढतात. देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. ज्यामुळं सामान्य लोकांमध्ये सोन्याच्या कर्जाची इच्छा वाढत आहे. मात्र तज्ञांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

सोन्याच्या किमती वाढल्यामुळे, लोक आता जुन्या दागिन्यांवर जास्त कर्ज घेऊ शकतात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी सोन्याच्या कर्जात अंदाजे 125 टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे, लोक आता जुन्या दागिन्यांवर जास्त कर्ज घेऊ शकतात. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की येथेच सर्वात मोठा धोका आहे. जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा तुमच्या तारण ठेवलेल्या दागिन्यांचे तारण मूल्य वाढते. बँका आणि वित्त कंपन्या सोन्याच्या बाजार मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. महागडे सोने लोकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्यास प्रवृत्त करू शकते, जे नंतर महागडे ठरू शकते. SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या वंदना भारती म्हणाल्या की युद्धाच्या बातम्यांमुळे किंमतींमध्ये होणारी वाढ अनेकदा भावनिक आणि तात्पुरती असते. तणाव कमी होताच, किंमती झपाट्याने कमी होऊ शकतात.

सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव आता अधिक तीव्र झाला आहे. अशातच या संघर्षाचा विस्तार झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत जाणवू शकतात. इराणने (Israel Vs Iran War) प्रत्युत्तरादाखल काही देशांमधील अमेरिकेंच्या बेसवरती हल्ले केल्याचे वृत्त समोर आले असून परिस्थिती अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. याचा थेट परिणाम भारतावरही पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Israel Vs Iran War) दुसरीकडेअमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासातच सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today)  मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यानगेल्या काही महिन्यापासून रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) मोठी वाढ झाल्यानंतर त्यात मागील महिन्यात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र, काल अमेरिका आणि इजरायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या नंतर गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या खरेदीकडे वळल्याने सोन्याच्या आणि चांदीच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.