ठाणे : अनधिकृत शाळेमुळे दहावीच्या परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या ११ विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाने मोठा दिलासा दिला आहे. शिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली आहे.
मुंब्रा परिसरातील 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' ही शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासात उघड झाले होते. या शाळेला बंद करण्याबाबत आणि दंडात्मक कारवाईबाबत नोटीसही बजावण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर चक्क ‘राजश्री लॉटरी’चे दुकान सुरू असल्याचे निदर्शनास आले. शाळेला शासकीय मान्यता नसल्यामुळे या ११ विद्यार्थ्यांचे दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
Mumbai Crime: अश्लील फोटो, सलग ८ महिने लैंगिक अत्याचार अन्...; काँग्रेस नेत्याचं २२ वर्षीय तरुणीसोबत संतापजनक कृत्यपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षणाधिकारी शेषराव बडे, यू.आर.सी. प्रमुख पठाण मुस्ताक आणि पथकाने शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून या ११ विद्यार्थ्यांचे अर्ज एका मान्यताप्राप्त शाळेमार्फत भरले जातील, जेणेकरून त्यांना जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेस बसता येईल.
तसेच अनधिकृतशाळा तत्काळ बंद करून विद्यार्थ्यांना इतर मान्यताप्राप्त शाळांमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, प्रवेश घेताना शाळेची अधिकृतता तपासूनच पाऊल उचलावे. अनधिकृत शाळांच्या जाळ्यात अडकून मुलांचे भविष्य धोक्यात घालू नका.
Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोरविद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर पावले उचलली जातील. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी शिक्षण विभाग सदैव तत्पर आहे. पालकांनी केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा.
- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी, ठाणे महापालिका