संजू सॅमसनने इतिहास रचला, १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; असा पराक्रम करणारा जगातला पहिला खेळाडू
esakal March 02, 2026 09:45 PM

Sanju Samson 97 runs vs West Indies Eden Gardens: संजू सॅमसनने वर्ल्ड कपस्पर्धेतील सुपर ८च्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजूने ९७ धावांची नाबाद खेळी केली आणि भारताला उपांत्य फेरीत पोहोचवले. भारताने हा सामना ५ विकेट्स व ४ चेंडू राखून जिंकला आणि आता त्यांच्यासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे ( ५ मार्च) आव्हान असणार आहे.

संजूने ५० चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह ९६ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त भारताच्या एकाही खेळाडूला ३० धावाही करता आल्या नाही. भारताच्या डावात तिलक वर्मा ( २७) हा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अव्वल व दुसऱ्या सर्वोत्तम धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये ६० धावांचे अंतर हे भारताकडून सर्वाधिक अंतर ठरले आहे.

IND vs ENG Semi: भारत-इंग्लंड सामना काही कारणास्तव झालाच नाही, तर काय होईल? फायनलला कोण जाईल? राखीव दिवसाचा नियम

सॅमसनची ९७ धावांची खेळी ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या डावात धावांचा पाठलाग करताना यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना यष्टीरक्षकांनी केलेल्या तीन सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या या २०२६ च्या आवृत्तीत आल्या आहेत. धावांचा पाठलाग करताना एका डावात ९० पेक्षा जास्त धावा करणारा संजू हा पहिला खेळाडू आहे. संजूने कोलकाता येथे विंडीजविरुद्ध नाबाद ९७ धावा केल्या. त्याआधी टीम सेइफर्टने चेन्नईत युएईविरुद्ध नाबाद ८९ धावा केल्या होत्या.

एकंदरीत, सॅमसनची खेळी ब्रेंडन मॅक्युलम, जॉस बटलर आणि निकोलस पूरन यांच्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात यष्टीरक्षक-फलंदाजाने केलेली चौथी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. शिवाय, सॅमसनची खेळी ही वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील धावांचा पाठलाग करताना यष्टीरक्षक फलंदाजाने केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. याआधीचा विक्रम कुमार संगकारा (६८) याच्याकडे होता, त्याने २०१० च्या बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात तो केला होता.

Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...

सॅमसनची ९७ धावांची खेळी ही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना फलंदाजाने केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. संजूने २००७ मध्ये झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत १९ वर्षांपूर्वी हर्शेल गिब्सने रचलेला विक्रम मोडला. त्याने जोहान्सबर्ग येथे ९० धावांची खेळी केली होती. २०१० मध्ये महेला जयवर्धनेच्या ९८ धावांनंतर,दोन वेळा विजेत्या वेस्ट इंडिजविरुद्ध ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.