Team India tactical changes for T20 World Cup knockout: भारतीय संघाने सुपर ८च्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जागा पक्की केली. करो वा मरो सामन्यात संजू सॅमसनने ९७ धावांची नाबाद खेळी करताना भारताला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. आता भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करायचा आहे. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्च रोजी होणार आहे. भारतीय संघाने इथपर्यंत मजल मारली असली तरी आघाडीच्या फळीत सातत्य नसणे, ही डोकेदुखी ठरणारी बाब आहे.
वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा ( १०) व इशान किशन ( १०) हे अयशी ठरले. सूर्यकुमार यादव मैदानावर उभा राहिला, परंतु त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताच्या आघाडीच्या फळीत बदल झालेला दिसू शकतो. अभिषेकवर फॉर्म रुसलेला आहे आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही डळमळीत झाला आहे. संघात इशान किशन असताना सलामीला खेळण्यासाठी भारताकडे अतिरिक्त पर्याय आहे.
Sanju Samson Struggle Story: बंदे में है दम...! संजू सॅमसन, आपला माणूस अन् त्याच्या पाठी खंबीर उभी राहणारी चारुलथा...या परिस्थितीत भारतीय संघ व्यवस्थापन अभिषेकला डावलून रिंकू सिंगला फिनिशर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू शकतात. अभिषेकने संघासाठी खरोखर चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे हा निर्णय सोपा असणार नाही. पण, त्याचा आत्मविश्वास आणि खेळाचे महत्त्व पाहता, त्याला थोडा ब्रेक देणे वाईट ठरणार नाही. यामुळे भारताला तिलक वर्माला तिसऱ्या क्रमांकावर वरच्या क्रमात खेळवता येईल.
गोलंदाजीतही भारतीय खेळाडूंना विशेष उल्लेखनीय कामगिरी करता आलेली नाही. जसप्रीत बुमराहने सातत्य राखले असले तरी अर्शदीप सिंगला अपेक्षित सूर गवसलेला नाही. नव्या चेंडूवर तो विकेट घेत नाहीए. त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. पण, संघ व्यवस्थापन गोलंदाजी विभागात बदल करण्याच्या पक्षात नाही.
IPL 2026 नंतर रोहित शर्मा, विराट कोहली पुन्हा निळ्या जर्सीत दिसणार; BCCI ने जाहीर केलं वेळापत्रक, तगडा संघ भारत दौऱ्यावर येतोय...भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्थी