कला-अध्यात्माचा जागतिक संगम
बोईसर (वार्ताहर) : विराज इंटरनॅशनल स्कूल येथे ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोलअंतर्गत प्रकाशाचे रंग’ हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. विराज प्रोफाइल्स प्रा. लि. यांनी साकारलेल्या उपक्रमात कला, संस्कृती, अध्यात्माचा उपस्थितांनी अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या नृत्यदिग्दर्शनाची धुरा रशियन नृत्यदिग्दर्शिका अन्ना पुस्टोबोइट यांनी सांभाळली. रशियन अभिव्यक्ती आणि भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा संगम घडविणारी त्यांची नृत्यरचना विशेष ठरली. विविध देशांतील रंगमंचीय अनुभवाचा ठसा त्यांच्या सादरीकरणातून उमटला. कार्यक्रमास ब्रह्माकुमारीज यांच्या रशियातील सेवांची अग्रणी बीके संतोषी उपस्थित होते. सेंट पीटर्सबर्ग केंद्राच्या संचालिका म्हणून ३५ हून अधिक देशांत आध्यात्मिक नेतृत्व केले आहे.