Iran Dubai Live News:अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा आज (4 मार्च) पाचवा दिवस आहे. इराणने अमेरिकेच्या मुस्लीम दोस्त राष्ट्रांना मिसाईल आणि ड्रोन मारा सुरुच ठेवला आहे. आज दुबईत अमेरिकन दुतावासावर इराणने हल्ला केला. इस्रायलने लेबनॉनमध्ये इराण समर्थक गट हिजबुल्लाहविरुद्ध लष्करी कारवाया तीव्र केल्या आहेत. लेबनॉन अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 50 लोक ठार झाले आहेत आणि 335 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायली लष्कर, इस्रायली संरक्षण दलांनी दक्षिण लेबनॉनमधील 16 गावे आणि शहरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. हिजबुल्लाहने उत्तर इस्रायली शहरातील मेतुला येथे इस्रायली सैन्यावर रॉकेट डागल्याचा दावा केला. यापूर्वी, त्यांनी हैफा नौदल तळावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याची धमकी देखील दिली होती.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दावा केला आहे की पहिल्या दोन दिवसांत प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमध्ये सुमारे 650 अमेरिकन सैनिक मारले गेले किंवा जखमी झाले. ही माहिती चिनी वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे. IRGC च्या प्रवक्त्यानुसार, इराणने अमेरिकन नौदलाच्या पाचव्या फ्लीट मुख्यालयावर आणि बहरीनमधील लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले. इराणने असाही दावा केला आहे की त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या लष्करी जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने सुमारे 300 इराणी क्षेपणास्त्र लाँचर नष्ट केल्याचा दावा केला आहे. या लक्ष्यांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आणि हवाई संरक्षण प्रणालींचा समावेश आहे. इस्रायली हवाई दलाचे म्हणणे आहे की हे हल्ले इराणच्या क्षेपणास्त्र क्षमता आणि हवाई संरक्षण प्रणाली कमकुवत करण्याच्या उद्देशाने आहेत. दरम्यान, सौदी अरेबियाने त्यांच्या हवाई क्षेत्राकडे येणाऱ्या नऊ इराणी ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेने असेही म्हटले आहे की त्यांनी आतापर्यंत इराणमधील अंदाजे 2000 लक्ष्यांवर हल्ला केला आहे. अमेरिकन आर्मी सेंट्रल कमांडचे प्रमुख ब्रॅड कूपर यांच्या मते, या कारवाईत 50 हजारहून अधिक सैनिक आणि अंदाजे 200 लढाऊ विमाने सहभागी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या