वसई : एका दुचाकीस्वाराने बंदोबस्तावरी असलेल्या वाहतूक पोलिसाला भर रस्त्यात मारहाण करत डोक्यात दगड घालून हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईच्या गोखिवरे नाक्यावर काल (मंगळवारी, ता ३) दुपारी ही घटना घडली. या हल्ल्यात वाहतूक पोलीस जसवंत वळवी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार तरुण एकाच दुचाकीवरून येत असल्याने त्यांना पोलिसाने अडवले होते.(Vasai Crime News)
धुळवड निमित्ताने मंगळवारी वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली होती. वसई वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार जसवंत वळवी (५२) हे मंगळवारी वसई पूर्वेच्या गोखविरे रेंज नाक्यावर बंदोबस्तासाठी होते. त्यांच्यासोबत अन्य एक पोलीस होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास एका दुचाकीवरून ४ जण जात असलेले वळवी यांना दिसले. त्यामुळे वळवी यांनी ती दुचाकी थांबवली. दुचाकीस्वार अभिषेक जैस्वार (२१) याने वळवी यांच्याशी हुज्जत घातली. अचानक तो आक्रमक झाला आणि त्याने जवळ पडलेला मोठा दगड उचलून वळवी यांच्या डोक्यात (Vasai Crime News) घातला. ते पाहून सोबत असलेले दुसरे पोलीस मदतीला आले. मात्र जैस्वार आक्रमकपणे दगडाने वळवी यांच्या डोक्यावर मारत होता. या हल्ल्यात वळवी रक्तबंबाळ झाले. त्यांच्या डोक्याला तीन ठिकाणी गंभीर दुखापत झाली. वळवी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(Vasai Crime News)
वालीव पोलिसांनी आरोपी अभिषेक जैस्वार याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती. (Vasai Crime News)
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी सचिन मोरे यांनी सांगितलं की, काल एक भायानक आणि विचीत्र घटना घडली. दोन अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरती चौघंजण बसून येत होते. पोलिसांना पाहून तो त्या तिघांना तिथे मागे उतरून तो एकटाच इकडे गाडी घेऊन आला त्यावेळी पोलिस अधिकारी त्यांची ड्यूटी करत होते, त्यावेळी त्याने हातात दगड घेऊन त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला, डोक्यावरती दगडाने हल्ला केला. वालीव पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढील तपास सुरू आहे.