Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?
esakal March 04, 2026 07:45 PM

Shiv Sena MNS political developments : महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमधील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तटस्थ भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. स्वीकृत नगरसेवकपदाबाबत अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याने केवळ प्रभाग समित्यांवर समाधान मानणार नसल्याची स्पष्ट भूमिका मनसेकडून मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला राजकीय फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये मनसेची भूमिका निर्णायक ठरू शकते, अशीही चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या घडामोडींनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले. दोघांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, प्रभाग समिती निवडणुकीतील भूमिकेसह आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, सोमय्या दाम्पत्याला दणका

मनसेनेतटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात ठाकरे बंधूंमधील राजकीय संबंध कोणत्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.