Ramrav Vadkute Gets BJP Rajya Sabha Nomination राज्यसभेसाठी महाराष्ट्रात भाजपने चार जणांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपकडून पुन्हा एकदा अनपेक्षित धक्का देत दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. भाजपने चार पैकी एक जागा मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला दिलीय. आरपीआयकडून रामदास आठवले यांचे नाव भाजपने जाहीर केलंय. तर याशिवाय विनोद तावडे, मायाताई ईवनाते आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आलीय. यातील मायाताई ईवनाते आणि रामराव वडकुते हे दोन नवे चेहरे आहेत.
मायाताई इवनाते या माजी महापौर असून त्या भाजपच्या आदिवासी महिला नेत्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्या निकटवर्तीय म्हणूनही ओळखल्या जातात. ईवनाते या नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. आता त्या नगरसेवक ते थेट राज्यसभा खासदार बनणार आहेत. ईवनाते यांच्याशिवाय मराठवाड्यातून रामराव वडकुते यांना संधी देण्यात आलीय. रामराव वडकुते हे माजी आमदार असून ते हिंगोली जिल्ह्यातील भाजप नेते आहेत.
भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईलामाजी आमदार असणारे रामराव वडकुते हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानपरिषदेची संधी दिली होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजप प्रवेश केला. ७ वर्षानंतर आता रामराव वडकुते यांना भाजपने राज्यसभेवर संधी दिलीय.
रामराव वडकुते यांना २००४ मध्ये राष्ट्रवादीने विधानसभेचं तिकिट दिलं होतं. पण त्यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर २००९च्या विधानसभेला त्यांना तिकिट डावलण्यात आलं. त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसनं राजीव सातव यांना संधी दिली. हिंगोलीतून विधानसभेसाठी प्रयत्न करणाऱ्या रामराव वडकुतेांना राष्ट्रवादी काँग्रेसनं २०१४मध्ये विधानपरिषदेवर पाठवत नाराजी दूर केली होती.
माजी आमदार रामराव वडकुते यांनी धनगर प्रश्नांवर आवाज उठवला आहे. ते हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधासनभा मतदारसंघात सक्रीय आहेत. २००२ मध्ये अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय. धनगर समाजाचे नेते अशीही त्यांची ओळख आहे.