अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
सुनील दिवाण, एबीपी माझा March 04, 2026 10:43 PM

Solapur Sangola Crime : अलिकडच्या काळात अवैध वाळू उपसा करण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर देखील हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. आज अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. अवैध वाळू उपसा विरोधात गेलेल्या महसूल पथकावर सांगोला येथे प्राणघातक हल्ला झाला आहे. आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. 

जोपर्यंत या वाळूमाफियांना अटक होत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरु

सांगोला तालुक्यात जवळा परिसरात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर आज पहाटे तीन वाजता महसूल चा पथकाने या ठिकाणी छापा टाकला. यावेळी या वाळू माफीयांनी या पथकावर प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मंडल अधिकारी महेश जाधव आणि त्यांचे एक सहकारी जखमी झाले आहेत. यावेळी माफी यांनी तहसील अधिकाऱ्यांची शासकीय गाडीही फोडली असून मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली आहे. यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सांगोला पोलिसात वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल केला असून कातडीने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान जोपर्यंत या वाळूमाफियांना अटक होत नाही तोपर्यंत महसूल कर्मचाऱ्यांनी मी मुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

वाळू माफियांचा मुजोरपणा वाढला

वाळू माफियांमुळे होणारा त्रास आणि त्यांची मुजोरी वाढली आहे. अनेक ठिकाणी वाळू उपसा आणि वाहतूक बेकायदेशीरपणे सुरू आहे. यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकारही घडत आहेत, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अशीच एक घटना माढा तालुक्यात घडली आहे. माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी वाळू माफियांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. अवैध वाळू उपसा करण्याविरोधात तहसीलदार भोसले यांनी कारवाई केली होती. यामुळं वाळू माफियांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. 
  • बेकायदेशीर वाळू उपसा:
    अनेक ठिकाणी वाळूचे अवैध उत्खनन केले जात आहे, ज्यामुळे नद्या आणि पर्यावरणाची हानी होत आहे.
     
  • अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले:
    वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.