Thalapathy Vijay Divorce: सध्या मनोरंजनविश्वात एका सुपरस्टारच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. तो सुपरस्टार (South Superstar) म्हणजे, तमिळ सुपरस्टार थलापती (Thalapathy Vijay). अभिनेत्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम (Sangeetha Sornalingam) हिनं 27 वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये तिनं विजयवर सहकलाकारासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले आहेत. तसेच, तिनं 27 फेब्रुवारी 2026 रोजी चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विजय सेतुपतीच्या बायकोनं याचिकेत कोणतंही नाव घेतलेलं नसलं तरीसुद्धा त्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिला वर्षानुवर्ष मानसिक त्रास झाला, असं तिनं घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे. अशातच आता या प्रकरणात एक नवा ट्वीस्ट आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विजय थलपतीला हे प्रकरण न्यायालयाच्या बाहेर सोडवायचं आहे. त्यासाठी सुपरस्टार अभिनेता आता मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
तामिळ फिल्मीबीटनं दिलेल्या वृत्तानुसार, थलपती विजयला हे प्रकरण लवकरात लवकर सोडवायचं आहे. विजयला त्याची वेगळी राहत असलेल्या पत्नीसोबतचं घटस्फोटाचं प्रकरण फार लांबवायचं नाही. त्यानं या प्रकरणाबद्दल तिच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केलाय आणि तिला 250 कोटी रुपयांची पोटगीसुद्धा देऊ केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विजय थलपतीनं ऑफर केलेली 250 कोटींची पोटगी पत्नी आणि तिची दोन मुलं, जेसन संजय आणि दिव्या साशा यांच्यासाठी आहे. दरम्यान, ही रक्कम पत्नी आणि मुलांमध्ये कशी विभागली जाईल, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जर विजय थलपतीनं दिलेली पोटगीची ऑफर पत्नीनं स्विकारली, तर घटस्फोटाची याचिका मागे घेतली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, विजयला त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपायची आहे आणि तो हे प्रकरण खाजगी ठेवू इच्छितो.
विजयची पत्नी संगीतानं तिच्या घटस्फोटाच्या याचिकेत विजयवर विश्वासघाताचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिनं विशेष विवाह कायदा, 1954 अंतर्गत हा खटला दाखल केला आहे, जो जोडीदाराला व्यभिचार आणि क्रूरता यांसारख्या कारणांवर घटस्फोटासाठी अर्ज करण्याची परवानगी देतो. याचिकेत विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचाही आरोप पत्नीनं लावला आहे.
संगीतानं याचिकेत असंही सांगितलंय की, तिला 2021 पासून त्याच्या प्रेमसंबंधाची माहिती आहे, ज्यामुळे तिच्यावर भावनिक आघात झालाय आणि तिला मानसिक त्रासाचाही सामना करावा लागलाय. या विश्वासघातामुळे तिचा लग्नावरील विश्वासही उडालाय. याचिकेत पुढे असा दावा करण्यात आला आहे की, विजयचे अभिनेत्रीसोबत उघड संबंध होते, ज्यामुळे संगीताला सतत भावनिक वेदना आणि त्यांच्या मुलांना लाज वाटत होती.
सुपरस्टार यशच्या चाहत्यांना धक्का, 'टॉक्सिक'च्या फिल्ममेकर्सकडून मोठा निर्णय; रिलीज डेट बदलली!