मुंबई : प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एफ दक्षिण आणि एफ उत्तर या प्रभाग समितीच्या निवडणुकीत ऐन वेळी समाजवादी पक्षाच्या एका सदस्याने महायुतीच्या बाजूने मतदान केल्यामुळे ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या मानसी सातमकर यांनी ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव केला.
मुंबईतील एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये समसमान मतं असल्याने समाजवादी पक्षाच्या सदस्याचं मत निर्णायक होतं. ऐनवेळी समाजवादी पक्षाच्या सदस्याने शिंदेंच्या मानसी सातमकर यांना मतदान केल्याने ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव झाला.
एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी महायुतीच्या मानसी मंगेश सातमकर ह्यांनी श्रद्धा जाधव ह्यांचा पराभव केला
- भाजप - 5
- शिवसेना शिंदे - 3
- सपा - 1
- ठाकरे - 6
- काँग्रेस - 1
- मनसे - 1
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये, दोन्ही बाजूंकडे समसमान मतं असल्याने समाजवादी पक्षाच्या सदस्याचं मत निर्णायक ठरलं. त्यामुळे ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा पराभव झाला.
सी अँड डी : भाजप- अकाश पुरोहित (बिनविरोध)
ए बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम, विजयी, भाजपच्या रोहिदास लोखंडे यांचा पराभव
एफ दक्षिण व एफ उत्तर : ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या मानसी सातमकर यांनी केला पराभव
आर उत्तर व आर मध्य : भाजप- प्रकाश दरेकर (बिनविरोध)
आर दक्षिण विभाग : भाजप-लिना देहेरकर (बिनविरोध)
पी पूर्व आणि पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे यांचा काँग्रेसच्या- हैदर अली शेख यांनी केला पराभव
ही बातमी वाचा: