Nagpur Video Viral : संतापजनक! होळी खेळताना अंगावर रंग उडवला म्हणून संतापलेल्या आजीने चार वर्षांच्या नातवावर ओतलं उकळतं पाणी, कमरेखालचा भाग गंभीररित्या भाजला
esakal March 05, 2026 08:45 PM

नागपूर : शहरातील कोराडी परिसरात अत्यंत संतापजनक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. होळी खेळताना अंगावर रंग उडवला (Nagpur Holi Incident) म्हणून संतापलेल्या एका आजीने स्वतःच्याच चार वर्षांच्या नातवावर उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम हरीश वांगे (वय ४) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव असून सिंधू ठाकरे असे संबंधित आजीचे नाव आहे. ओम हा घराबाहेर पिचकारीने होळीचा रंग खेळत होता. त्यावेळी आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले पाणी बादलीत भरून नेत होत्या.

Nashik Hostel Crime : धक्कादायक! वसतिगृहात गुंगीचं औषध देऊन दहावीतील विद्यार्थ्यांनी पाचवी-सातवीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर केला अत्याचार; इगतपुरीतील घटनेने खळबळ

दरम्यान, खेळकरपणे ओमने पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर उडवला. यामुळे संतापलेल्या आजीने होळीवर तापवलेले उकळते पाणी असलेली बादली थेट ओमच्या अंगावर ओतल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakal News (@sakalmedia)