IND vs ENG T20 WC Semi-Final Wankhede Stadium Pitch: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि इंग्लंड संघात गुरुवारी (५ मार्च) उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
सलग तिसऱ्यांदा भारत आणि इंग्लंड टी२० वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2026) उपांत्य सामन्यात आमने-सामने असणार आहेत. याआधी २०२२ आणि २०२४ टी२० वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने-सामने होते. २०२२ मध्ये इंग्लंडने, तर २०२४ मध्ये भारताने बाजी मारली होती. आता यंदा या दोन तुल्यबळ संघातील कोणता संघ बाजी मारणार, हे पाहाणे रंजक असेल.
T20 WC, NZ vs SA: अॅलेनच्या शतकी वादळात युवराज सिंगचाही १९ वर्षे जुना विक्रम मोडला; 'हा' पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरलाया सामन्यापूर्वी खेळपट्टीबाबतही बरीच चर्चा झाली आहे. वानखेडेवर लाल मातीची खेळपट्टी असून ही खेळपट्टी साधारणत: फलंदाजीला पोषक समजली जाते. या मैदानाची बाऊंड्री छोटी असून यावरील उसळीवर शॉट्स खेळणे सोपे ठरते. पण या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळते.
दरम्यान, उपांत्य सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर थोडे गवत आहे, त्यामुळे गोलंदाजांना मदत मिळू शकते, पण भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने म्हटले आहे की मोठ्या धावसंख्येचा हा सामना होईल.
दरम्यान गेल्यावर्षी जेव्हा या मैदानात भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सामना झाला होता, तेव्हा अभिषेक शर्माने विक्रमी शतकी खेळी केली होती. त्यामुळे यावेळीही अभिषेककडून भारताला मोठी अपेक्षा असेल.
दरम्यान, भारतीय संघ या मैदानात टी२० वर्ल्ड कप २०२६ मधील पहिला सामना खेळला होता, त्यावेळी भारताने विजय मिळवला असला, तरी फलंदाजांनी संघर्ष केला होता. तसेच इंग्लंडने दोन सामने या मैदानात खेळले आहेत.
या मैदानात त्यांनी नेपाळला ४ विकेट्सने पराभूत केले होते, तर वेस्ट इंडिजकडून इंग्लंडला ३० धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. इंग्लंडचा खेळाडू सॅम करनने म्हटले आहे की इथली परिस्थिती त्यांच्यासाठी नवीन नसेल.
नाणेफेक जिंकल्यास या मैदानात धावांचा पाठलाग करण्यास संघाची पसंती असू शकते. या मैदानात आत्तापर्यंत १६ आंतरराष्ट्रीय टी२९ सामने खेळवण्यात आले असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत.
नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने १० सामने, तर नाणेफेक हरणाऱ्या संघाने ६ सामने जिंकले आहेत. या मैदानातील सर्वोच्च टी२० धावसंख्या २५४ आहे, जी वेस्ट इंडिजने काही दिवसांपूर्वीच झिम्बाब्वेविरुद्ध केले होते. सर्वात निचांकी ९७ ही धावसंख्या इंग्लंडने गेल्यावर्षी भारताविरुद्ध केली होती.
T20 WC, NZ vs SA: 'गालावर थोबाडीत मारली असं... ', न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर एडेन मार्करम काय म्हणाला?भारत आणि इंग्लंड यांच्यात आत्तापर्यंत टी२० वर्ल्ड कपमध्ये ५ सामने झाले असून तीन भारताने जिंकले आहेत, तर इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत. भारत आणि इंग्लंड संघात एकूण २९ टी२० सामने झाले आहेत, त्यातील १७ सामने भारताने, तर १२ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.