मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीच्या पूर्वसंध्येला आपले मत व्यक्त करताना म्हटले की, भारत व इंग्लंड या दोन्ही देशांना उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले.
मात्र, आता उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासापेक्षा पुढील दोन लढतींत जिंकणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण त्यानंतरच जेतेपद पटकावता येणार आहे. मॉर्ने मॉर्केल पुढे म्हणाला की, मान्य आहे की भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत झेल सोडले आहेत.
T20 World Cup : संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळणार? वर्ल्डकपमध्ये आज भारत-वेस्टइंडीज टी-२० सामना, कशी असेल Playing XI?एक नक्की आहे की कोणी मुद्दामहून झेल सोडत नाही. मी खात्रीने सांगू शकतो की भारतीय संघ क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी खूप सराव करत आहे. सुनियोजित मेहनत करत आहे. टी-२० सामन्यात क्षेत्ररचनेत काही महत्त्वाच्या जागा असतात, जिथे सर्वोत्तम खेळाडूला उभे करावे लागते, पण दुसऱ्या बाजूला दर वेळी तशी क्षेत्ररचना लावणे शक्य होतेच असे नाही. मला वाटते की खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारून क्षेत्ररक्षणातील महत्त्वाच्या जागी उभे राहून योग्य कामगिरी करायला पाहिजे. एक चांगला झेल सामन्याचा रंग बदलू शकतो आणि गोलंदाजाला प्रेरणा देऊ शकतो.
फलंदाज म्हणून यश मिळवल्यानेच नेतृत्वाची धुरासूर्यकुमार यादव नुसता खेळाडू म्हणून खेळताना वेगळा फलंदाज भासत होता. कप्तान झाल्यापासून त्याच्या आक्रमकतेला वेसण घातली गेली आहे का? कप्तान सूर्यकुमार यादवच्या भूमिकेतून बाहेर पडून तो फलंदाज म्हणून कसा मैदानात उतरतो, या प्रश्नांची उत्तरे जाणायला जेव्हा सूर्यकुमार यादवशी संवाद साधला, तेव्हा तो म्हणाला की भारतीय संघात मी प्रथम फलंदाज आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज म्हणून नाव कमावल्यानेच त्याला टी-२० संघाचे नेतृत्व करायला मिळाल्याची जाणीव त्याला आहे, हे जाणवले.
T20 World Cup: विजयाचा 'रिमोट कंट्रोल' गोलंदाजांच्या हातात! इरफान पठाणने उलगडले टी-२० मधील गोलंदाजीचे गुपित संघाच्या गरजेनुसार फलंदाजी : यादवसूर्यकुमार यादव या वेळी म्हणाला, मला संघाने नेमून दिलेली भूमिका दुहेरी आहे. नेतृत्व महत्त्वाचे आहे, अगदी त्याचप्रमाणे फलंदाजाची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे. तेव्हा फलंदाजीला उतरताना कप्तानपद बाजूला ठेवावे लागते. संघाची गरज काय आहे, हे लक्षात घेऊन खेळायचा विचार करावा लागतो. मी फक्त आणि फक्त संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करायचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला गरज असली, तर आक्रमकता बाजूला ठेवून थोडा सावध खेळ करावा लागतो. कधी गरज असताना मोठ्या धावगतीने पहिल्यापासून मोठे फटके मारायचा विचार करावा लागतो, असे सूर्यकुमार यादवने सांगितले.