Dhanraj Dangat wife wanted poster viral: स्टार प्रवाहवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पार्थ काव्या आणि जीवा नंदिनी यांचं लग्न होतं. कन्यादानाची जेव्हा वेळ येते, तेव्हा नंदिनीला बाबांचा जीवासाठी असणारा विरोध आठवतो. मात्र, लग्नाच्या दिवशी नंदिनीचे बाबा तिचं लग्न जीवाशी लावतात. यावेळी जीवा सुद्धा भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं. काव्याला सुद्धा आधी आपले बाबा या लग्नाशी नाराज असल्याचं आठवतं. मात्र, लग्नाच्या दिवशी काव्याचे बाबा स्वखुशीने काव्याचा हात पार्थ देशमुखांकडे सोपवतात. यावेळेस चौघेही भावुक होतात.
दोन्ही जोडप्यांचा लग्न सोहळा पार पडत असताना, काव्या आणि नंदिनीला जुन्या गोष्टी आठवत असतात. भूतकाळातले काही क्षण चौघांच्या डोळ्यांसमोरुन जात असतात. यावेळी चौघेही प्रचंड भावुक होतात. सप्तपदीदरम्यान, चौघेही एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. मोहिते आणि देशमुख कुटुंब हे सगळं पाहून खूप खूश असतात. घरात आनंदाचे वातावरण असते. पण या सगळ्यात एकच व्यक्ती नाराज असते, ती व्यक्ती म्हणजे, रम्या.
रम्या एकटी हॉलमध्ये फिरत असते, तिला एक मुलगा येऊन धडकतो. हा मुलगा सध्या उन्हातान्हात सर्वत्र एक पोस्टर घेऊन फिरत आहे. या पोस्टवर 'बायको पाहिजे', असं लिहिलं आहे. या मुलाचा पोस्टर घेऊन फिरतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्या मुलाची धडक रम्याला झाल्यानंतर तो हरकतो. तो मुलगा रम्याला तुम्ही सिंगल आहात का? असा प्रश्न विचारतो. त्यावर रम्या, 'मी सिंगल असली तरी, मनाने मॅरिड आहे. लहानपणीच माझं एकाशी लग्न झालंय..', असं म्हणते. तिचं बोलणं ऐकून तो तेथून निघून जातो.
View this post on Instagram
दरम्यान, उन्हातान्हाचं रस्त्यावर, ट्रेनमध्ये 'बायको पाहिजे', असं पोस्टर घेऊन फिरणारा तरुण आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत. दरम्यान, धनराज धोंडीराज दांगट असे त्या तरुणाचे नाव असून, धनराज बायको शोधण्यासाठी एवढा वणवण का भटकतो आहे? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होत आहे. धनराज आहे तरी कोण? तो बायको शोधण्यासाठी एवढा खटाटोप का करतो आहे? हे लवकरच समोर येईल.