Washim HSC Exam Mass Copying Case : वाशिम जिल्ह्यात 10वी आणि12वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी (Board Exam Copy) प्रकारांबाबत दोषी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात अली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 22 जणांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्य.) मंगल धुपे यांनी दिली आहे. कॉपी प्रकरणी शिक्षण आयुक्त यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दूरध्वनीद्वारे परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. (Washim HSC Exam 2026)
Washim HSC Exam 2026 : एकूण 51 गुन्हे नोंद, 22 कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांनी केले निलंबित
दरम्यान, कॉपी प्रकरणी पत्राद्वारेही संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात गुन्हे नोंद असलेल्या 51 शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांना कळविण्यात आले होते. त्यापैकी . मैनागिरी महाराज विद्यालय जुमडा येथील 10 अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर, तसेच 7 स्वयंअर्थसहायित तत्वावरील शिक्षकांना संस्थेकडून निलंबित करण्यात आलेय. तर मातोश्री बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, मांगवाडी अंतर्गत माऊली विद्यालय, मोहजा येथील 5 स्वयंअर्थसहायित शाळेतील शिक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातील एकूण 51 गुन्हे नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 22 कर्मचाऱ्यांना संबंधित संस्थांनी निलंबित केले असून उर्वरित प्रकरणांबाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचेही माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे-गायकवाड यांनी दिली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरणे उघडकीस आलेली केंद्रे
मानोरा तालुका – रुई
वाघामय देवी आदिवासी ज्युनिअर कॉलेज – १७ विद्यार्थी पकडले
शेंदुरजना आढाव
अप्पास्वामी ज्युनिअर कॉलेज – २ विद्यार्थी
किन्हिराजा
वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज – १ विद्यार्थी
रिसोड तालुका – मांडवा
ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज – २१ विद्यार्थी
बाबासाहेब धाबेकर ज्युनिअर कॉलेज – ३ विद्यार्थी
विद्यार्थ्यांवर कारवाईसोबतच परीक्षा केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षकांच्या भूमिकेवरही प्रशासनाने बोट ठेवलं आहे.
आगामी पेपरमध्ये आणखी कडक तपासणी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Beed News: पेपरचे चिट दगडात गुंडाळून विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा; गेवराईतील पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरील प्रकार समोर
बीडच्या गेवराईतील पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या कॉपी पुरवठ्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय. यंदाच्या बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्या याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पावलं उचलली. परंतु पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आले. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला. पेपरचे चीट एका दगडात गुंडाळून खिडकीद्वारे फेकण्याचा प्रकार यातून दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच कॉपी पुरवठा प्रकरणात 17 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तरी देखील बीडच्या ग्रामीण भागात हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या