प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...
esakal March 06, 2026 12:45 PM

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने २०१८ मध्ये हॉलिवूड गायक निक जोनास याच्याशी लग्न केलं. त्यांच्या जोडीची चांगलीच चर्चा रंगली. निक आणि प्रियांका कायम प्रेक्षकांना कपल गोल्स देत आले. मात्र ते सगळ्यात जास्त चर्चेत आले ते त्यांच्या सरोगसीमुळे. २०२२ मध्ये प्रियांका आणि निक यांनी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव मालती मेरी असं आहे. मात्र सरोगसी केल्याने तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने ट्रोलर्सना उत्तर देत मालतीसाठी सरोगसीचा निर्णय का घेतला याचं कारण सांगितलं आहे.

एका मुलाखतीत प्रियांका म्हणाली, 'तिच्या जन्माच्या वेळी खूप अडचणी आल्या होत्या. २७ आठवड्यांतच ती जन्माला आली होती आणि १०० दिवसांपेक्षा जास्त काळ एनआयसीयू (निओनेटल इंटेंसिव्ह केअर युनिट) मध्ये राहिली. मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्येच होते. ती खूपच लहान होती; अगदी माझ्या हातापेक्षाही लहान. आम्ही दररोज तिच्याबरोबर वेळ घालवत होतो. त्यावेळी ती वाचेल की नाही, याचीही आम्हाला खात्री नव्हती.'

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)