पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे…. मुंबईतील या निवडणुकीची का होतेय महाराष्ट्रात चर्चा?
Tv9 Marathi March 06, 2026 01:45 PM

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेत महायुतीचा झेंडा फडकला आहे. निवडणुकीपूर्वी मनसे आणि उद्धव सेना हे दोन्ही पक्ष यांच्यात दिलजमाई झाली. दोघांनी एकत्रित निवडणूक लढली. त्यावेळी अनेकांनी पक्षांची साथ सोडली. तरीही या निवडणुकीत ठाकरे ब्रँड दिसून आला. पण कल्याण-डोंबिवली आणि इतर ठिकाणी शिंदे सेना-भाजप पाठिंब्यावरून नाराजी नाट्य रंगले. तर आता सगळ्यांचे लक्ष विशेष समित्या आणि प्रभाग समिती निवडणुकीकडे लागले आहे. बुधवारी २५ विभाग कार्यालयांचा समावेश असलेल्या १७ प्रभाग समित्यांसाठी नगरसेवकांनी अर्ज भरले. आज शुक्रवारी कोण अर्ज मागे घेणार त्यावरून ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार की, दोन्ही पक्षात सामंजस्य दिसणार हे समोर येईल.

ठाकरे बंधू एकमेकांविरोधात लढणार की तोडगा निघणार ?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीचा आजचा दुसरा दिवस आहे. आज ठाकरे बंधू एकमेकांविरोधात लढणार की तोडगा निघणार? याची चर्चा रंगली आहे. एकूण ६ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. ६ पैकी ५ ठिकाणी उमेदवारी न आल्याने अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणार आहेत.

जी उत्तर प्रभाग समितीत चुरस, मनसे विरुद्ध ठाकरे सेनेत थेट लढत

१) एच/पूर्व आणि एच/पश्चिम (बिनविरोध)

२) जी/दक्षिण (बिनविरोध)

३) पी/दक्षिण (बिनविरोध)

४) के/पश्चिम (बिनविरोध)

५) के/उत्तर आणि के/दक्षिण (बिनविरोध)

६) जी/उत्तर (थेट लढत)

मुंबई महापालिकेच्या उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय चुरस

१.मनसे आणि शिवसेना (ठाकरेंची शिवसेना) या दोन पक्षांतील उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे थेट लढत

२.मनसेकडून यशवंत किल्लेदार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला

३.तर शिवसेना (ठाकरेंच्या सेनेकडून) जोसेफ कोळी यांनीही उमेदवारी अर्ज भरला

४.दोन दिवसांपूर्वी अर्ज भरताना यशवंत किल्लेदार युतीचे उमेदवार होते, मात्र ठाकरेंच्या कोळी यांनीही अर्ज भरल्याने निवडणूक

५.दोन्ही पक्षांचे उमेदवार मैदानात उतरल्यामुळे जी उत्तर प्रभाग समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार

६.महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र असले तरी या प्रभागात थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

७.निवडणुकीपूर्वी उमेदवार अर्ज मागे घेतल्यास परिस्थिती बदलू शकते

८.त्यामुळे जी उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी १५ मिनिटं आधी काय चुरस रंगणार याकडे वर्तुळाचे लक्ष

कोण होणार बिनविरोध अध्यक्ष ?

एच-पूर्व/पश्चिम – रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे)

के पश्चिम – रोहन राठोड (भाजपा)

के-दक्षिण/के-उत्तर – प्रकाश मुसळे (भाजपा)

पी-दक्षिण – श्रीकला पिल्ले (भाजपा)

जी-दक्षिण –पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.