NRK26A00636
मुंबई ः येथे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे दालनात वाळूज येथील भोगावती नदीवरील पुलासंदर्भात चर्चा करताना विविध मान्यवर.
भोगावती नदीवरील पुलासाठी तरतूद करू ःमंत्री शिवेंद्रराजे भोसले
दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांची माहिती; मुंबईत बैठक
सकाळ वृत्तसेवा
नरखेड, ता. ५ ः सोलापूर ते वाळूज दरम्यान भोगावती नदीवरील पुलासंदर्भात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. या पुलाच्या प्रस्तावास अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्यानंतर निधीला मंजुरी मिळेल असे बैठकीत सांगितले.
वाळूज-सोलापूर दरम्यान भोगावती नदीवर पूल बांधण्यासंदर्भात ५० वर्षांपासूनची मागणी आहे. नदीपलीकडील शिवारात तीनशे ते चारशे लोक जाधव वस्ती व शहरातील राहते वस्तीत वाळूजचे ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. पावसाळ्यातील चार महिने त्यांचा व गावाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी विविध जीव घेण्यास संकटाला सामोरे जावे लागते.
पुलाचे राजकीय भांडवल मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार शरद बनसोडे, खासदार प्रणिती शिंदे, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, रमेश कदम, यशवंत माने व विद्यमान आमदार राजू खरे यांनी केले. परंतु अद्याप पुलाची उभारणी झाली नाही. परंतु शासन दरबारी असलेला प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी घ्यावी, याचा पाठपुरावा करण्यासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, प्रा. प्रकाश कादे व अमोल देशमुख या शिष्ट मंडळाची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.